How To Use Clutch While Driving Car:  गाडी चालवताना खूप सतर्क रहावं लागतं. गाडीमध्ये तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहिला एक्सीलेटर, जो वाहनाचा वेग वाढवतो. दुसरा ब्रेक आहे, जो वाहन त्वरीत थांबवण्यासाठी वापरला जातो आणि तिसरा क्लच आहे, जो एक्सीलेटर आणि ब्रेक यांच्यातील दुवा म्हणून काम करतो. ड्रायव्हिंग शिकताना अनेक लोक चुका करतात, तर बरेच लोक असे देखील आहेत, ते बऱ्याच काळापासून ड्रायव्हिंग करत आहेत परंतु तरीही चुका करतात. माहिती नसल्यामुळे किंवा चुकीच्या प्रशिक्षणामुळे लोक अनेकदा वाहन चालवताना चुका करतात. पण जर तुम्ही या चुका पुन्हा-पुन्हा करत असाल तर कार लवकर बिघडायला लागते आणि त्यात नेहमीच काही ना काही समस्या निर्माण होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारच्या क्लचचा योग्य वापर हे असेच एक ड्रायव्हिंग कौशल्य आहे जे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. अनेक वेळा जुन्या कार चालकांनाही गाडीच्या क्लचचा योग्य वापर कळत नाही. क्लच वापरताना कार चालक अनेकदा काही चुका करतात. आज आम्ही तुम्हाला या चुका कशा दुरुस्त करु शकता आणि क्लचचा योग्य वापर कसा करावा, हे सांगणार आहोत.

(हे ही वाचा : कारचा ब्रेक लावताना क्लच का दाबू नये तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या त्यामागील खरे कारण )

कार चालवताना ‘या’ चुका करु नका

१. क्लच सोडण्याची घाई करू नका

ट्रॅफिकमध्ये वाहन चालवताना बहुतेक लोक ही चूक करतात. जर गाडी ट्रॅफिकमध्ये अधूनमधून जात असेल, तर तुम्ही क्लच धक्का देऊन सोडू नये. जेव्हा ट्रॅफिक सिग्नलवर गाडी थांबवली जाते, तेव्हा क्लच सोडू नका आणि झटका देऊन एक्सलेटर दाबा, यामुळे कार थांबू शकते. असे वारंवार केल्याने क्लच प्लेट लवकर झिजते आणि इंजिनवरही वाईट परिणाम होतो.

२. गीअर्स बदलताना क्लचला अर्धा प्रेस करणे

बरेच लोक गीअर्स बदलताना क्लच अर्धवट दाबतात. त्यामुळे गीअर नीट सुटत नाही आणि असे केल्याने गिअरबॉक्समधून आवाज येऊ लागतो. हे जास्त वेळ केल्याने गीअरबॉक्स खराब होऊ शकतो. म्हणून, गीअर्स बदलताना क्लच पूर्णपणे दाबणे आवश्यक आहे.

३. क्लच पूर्णपणे सोडू नये

काही लोक अनेकदा क्लचवर पाय ठेवून गाडी चालवतात. ज्यामुळे क्लच आणि गिअरबॉक्स दोन्हीचे नुकसान होते. त्यामुळे क्लच प्लेटही झिजायला लागते.

(हे ही वाचा : ५.७ लाखाच्या ‘या’ विदेशी कारसमोर सर्व पडल्या फेल, खरेदीसाठी हजारो ग्राहकांच्या रांगा, इतर कंपन्या पाहतच राहिल्या )

४. क्लच वारंवार दाबणे

अनेकांना गाडी चालवताना विनाकारण क्लच दाबण्याची सवय असते. असे केल्याने गाडीत बसलेल्या प्रवाशांना धक्का बसतो आणि प्रवासाची मजाही बिघडते. गिअरबॉक्सच्या घटकांना जास्तीत जास्त नुकसान होते.

५. स्पीड कमी करण्यासाठी क्लच दाबणे

स्पीड कमी करताना क्लचला डिप्रेस करणे ही देखील चांगली सवय नाही. जेव्हा तुम्हाला कार पूर्ण थांबवायची असेल किंवा गीअर्स बदलायचे असतील तेव्हाच तुम्ही क्लचचा वेग कमी केला पाहिजे. जर तुम्हाला फक्त कारचा वेग कमी करायचा असेल तर तुम्ही क्लच न दाबता ब्रेक लावू शकता.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to use clutch while driving car know the game of clutch pressing beware of these 5 mistakes know the right way to use pdb
Show comments