ऑटो विश्वात सध्या पेट्रोल डिझेल ऐवजी इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला आहे. कंपन्यांनी भविष्याचा विचार करता आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांचे एकाहून एक सरस मॉडेल आणण्याची कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. आता चीनची दिग्गज टेलिकॉम कंपनी Huawei इलेक्ट्रिक कार निर्मितीमध्ये आपला जम बसवत आहे. कंपनीने चीनची ऑटोमोबाईल कंपनी Changan Auto आणि CATL सोबत मिळून Avatr कार ब्रँड तयार केला आहे. यासाठी तयार केलेली कंपनी Avatr Technology ने आपली पहिली इलेक्ट्रिक कार Avatr 11 समोर आणली. Avatr 11 पूर्णपणे इलेक्ट्रिकवर चालणारी एसयुव्ही आहे. विशेष म्हणजे ही गाडी सिंगल चार्जमध्ये ७०० किमी अंतर कापते, असा दावा करण्यात येत आहे. तर पुढच्या पाच वर्षात कंपनी आणखी ४ गाड्या लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Avatr 11 मध्ये २०० kWh ची हायव्होल्टेज सुपर चार्जेबल बॅटरी दिली गेली आहे. सिंगल चार्ज केल्यानंतर ही गाडी ७०० किलोमीटरपर्यंत अंतर कापते. त्याचबरोबर या गाडीत ४०० वेगवेगळे इंटेलीजेंट ड्रायव्हिंग फिचर्स दिले आहे. Avatr 11 ला कंपनीने मिनिमललिस्टिक लूक दिला आहे. अर्थात एक्स्टेरिअरवर जास्त खर्च केलेला नाही. गाडी स्पोर्टी असूनही साधी दिसते. गाडीच्या एलॉय व्हिलमुळे गाडी लक्ष वेधून घेते. गाडीची लांबी ४.८ मीटर आहे, असं आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कळते. त्याचबरोबर या गाडीचा पिकअपही चांगला आहे. ४ सेंकदात गाडी ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडते. त्यामुळे ही गाडी कधी लॉन्च होणार याबाबतची उत्सुकता कारप्रेमींमध्ये आहे. चायनापीईवी डॉट कॉमच्या मते ही गाडी वर्ष २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत लॉन्च होण्याची शक्यता आहे.

अपकमिंग सुझुकी-ऑल्टोचे स्पेसिफिकेशन ऑनलाइन लीक; नेमकं काय असेल जाणून घ्या

Avatr 11 गाडीचा सिंगल चार्जवर ७०० किमीचं अंतर कापते समजल्यानंतर त्याची किंमतही तशीच आहे. गाडीची किंमत ३,००,००० युआन म्हणजे ३५ लाखाच्या घरात असू शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huawei avatr e11 unveiled with a range of 700 kms rmt