Car Discounts for October: भारतात सध्या सणासुदीला सुरुवात झाली आहे. या काळात अनेकजण आपली घर, कार इत्यादी मोठी स्वप्ने पूर्ण करतात. त्यामुळे सणासुदीच्या काळात घरे आणि गाड्यांची मोठी विक्री होते. खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठीच ऑटो कंपन्या बंपर सूट देतात. यावेळी, सणासुदीच्या काळात विक्री वाढवण्यासाठी वाहन कंपन्यांनी बंपर डिस्काउंट ऑफर आणल्या आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊन चांगली बचत करू शकता. चला तर मग पाहूया कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळतो.

मारुतीच्या वाहनांवर किती सूट?

मारुती अल्टो 800 वर ग्राहकांना १५,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. त्याच वेळी, Alto K10 वर ४,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि ३०,००० रुपयांचा बोनस आणि १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. म्हणजेच एकूण ४९,००० रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. मारुती सुझुकी सेलेरियोवर ३५,००० रुपयांपर्यंतच्या ऑफर उपलब्ध आहेत. याशिवाय २०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ४,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. म्हणजेच एकूण ५९,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
Advay Hire , Malegaon Bazar Committee Chairman,
मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे अपात्र, शिवसेना ठाकरे गटाला धक्का

Maruti Suzuki S-Presso वर ३०,००० रुपयांची सूट आहे. वॅगन-आर वर २५,००० रुपयांची सूट, २०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ४,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. मारुती सुझुकी स्विफ्ट २५,००० रुपयांच्या रोख सवलतीसह, २०,००० रुपयांच्या एक्सचेंज बोनस आणि ४,००० रुपयांच्या कॉर्पोरेट सूटसह उपलब्ध आहे. मारुती सुझुकी ब्रेझा मिडसाईज एसयूव्हीच्या पेट्रोल एमटी आणि एएमटी प्रकारांवर ४५,००० रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे.

(हे ही वाचा : सर्वसामान्यांचे स्वप्न होणार पूर्ण! १,२०० रुपये द्या अन् बिनधास्त चालवा रॉयल एनफिल्डची बुलेट, कंपनीचा प्लॅन पहा जरा )

होंडा वाहनांवर सवलत

होंडा आपल्या सिटी आणि अमेझ या सेडान कारवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. कंपनी सिटीवर ७७,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. Amaze वर ६०,१४७ रुपयांपर्यंत सूट आहे. रोख सवलत मिळवून किंवा दोन्ही वाहनांवर अॅक्सेसरीज बसवून ग्राहक या सवलतीचा लाभ घेऊ शकतात. सिटीची किंमत रु. ११.६३ लाख ते रु. १६.११ लाख आहे, तर Amaze ची किंमत रु. ७.१० लाख आणि रु. ९.८६ लाख (सर्व किंमती एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

एमजी मोटर्सच्या वाहनांवर सूट

एमजी मोटर्सही आपल्या वाहनांवर मोठी सूट देत आहे. एमजी हेक्टर आणि हेक्टर प्लसच्या किमती कमी केल्यानंतर कंपनीने ZS EV च्या किमतीही कमी केल्या आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, किंमत जवळपास ५०,००० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही दरकपात करण्यात आली आहे.

रेनॉल्टच्या वाहनांवर सूट

रेनॉल्टने त्यांच्या Kwid, Triber आणि Kiger या तिन्ही मॉडेल्सवर ऑक्टोबरसाठी सणाच्या ऑफरही सादर केल्या आहेत. ही वाहने खरेदी केल्यावर, ग्राहकांना रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि बरेच काही फायदे मिळू शकतात. लॉयल्टी बोनस व्यतिरिक्त, तिन्ही मॉडेल्सच्या बेस RXE प्रकारांवर कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. Kwid RXE आणि Triber RXE ला रु. १०,००० चा लॉयल्टी बोनस मिळतो, तर Kiger RXE ला रु. २०,००० चा जास्त बोनस मिळतो.

Story img Loader