सणासुदीचा हंगाम अवघ्या काही दिवसांत सुरू होणार आहे. कार निर्माते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोठ्या डिस्काउंट ऑफर देत आहेत. ज्यावर सवलतीच्या ऑफर्स मिळत आहेत. तसेच, तुम्ही त्यांच्या खरेदीवर कमाल ५४,००० रुपये वाचवू शकता. पाहा कोणत्या आहेत त्या गाड्या.

Hyundai Grand i10 Nios

ह्युंदाई या नवरात्रीला Grand i10 Nios वर जबरदस्त सूट देत आहे. सप्टेंबर महिन्यात तुम्हाला Grand i10 Nios वर ४८,००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. तुम्हाला ३५,०० रुपयांची रोख सूट, १०,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि Nios खरेदीवर ३,००० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट मिळेल.

Renault Triber MPV

या महिन्यात रेनॉल्टच्या ट्रायबरवर ब्रँडला सर्वात मोठी सूट मिळत आहे. त्याच्या कारच्या खरेदीवर तुम्ही ५०,००० रुपयांपर्यंत बचत करू शकता. १५,००० रुपयांपर्यंत रोख सवलत, एक्सचेंज बेनिफिट म्हणून २५,००० रुपयांपर्यंतची ऑफर आणि १०,००० रुपयांचा कॉर्पोरेट बेनिफिट आहे.

आणखी वाचा : महिंद्राच्या ग्राहकांना मोठा झटका! लोकप्रिय SUV बोलेरो झाली महाग, जाणून घ्या किंमतीत झाला किती बदल

Maruti Suzuki Celerio

सप्टेंबर महिन्यात मारुतीच्या सेलेरियोवर सर्वाधिक सवलत दिली जात असून एकूण ५४,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यात S-Cross प्रमाणेच ३५,००० रुपयांची रोख सवलत, १५,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ४,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. दुसरीकडे, त्याचे स्वयंचलित प्रकार फक्त १०,००० रुपयांच्या रोख सवलतीसह येते.

Renault Kwid

जर तुम्ही सप्टेंबर महिन्यात Renault Kwid खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की या महिन्यात कंपनीने त्यावर ३५,००० रुपयांपर्यंत कमाल सूट दिली आहे. रोख सवलत म्हणून १०,००० रुपये आणि कॉर्पोरेट सूट म्हणून १०,००० रुपयांपर्यंतची ऑफर आहे. तसेच, Kwid च्या १.० लिटर व्हेरियंटवर १५,००० रुपये आणि ०.८ लिटर व्हेरिएंटवर १०,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज बेनिफिट आहे.

Story img Loader