दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक जण सोन्या चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गाड्या खरेदी करत असतात. तुम्हालाही टीव्हीएस कंपनीची बाईक खरेदी करायची असेल तर मोठी ऑफर मिळू शकते. टीव्हीएस आपल्या बाईक्सवर भरघोस डिस्काउंट देत आहे. यामध्ये कंपनी आपल्या वेगवेगळ्या बाईक्सवर ८,००० रुपये पर्यंतचा डिस्काउंट ऑफर करत आहे.

Star City Plus डिस्काउंट ऑफर

टीव्हीएस आपल्या Star City Plus या बाईकवर रोख २,१०० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. त्याचबरोबर बाकीचे इतर फायदे एक्स्चेंज बोनस आणि कॉपरेट डिस्काउंट च्या स्वरूपात मिळतील.

TVS Star City फायनान्स प्लॅन

जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला ही बाईक फायनान्स प्लॅनद्वारे खरेदी करायची असेल, तर कंपनी या बाईकवर ८ हजार रुपयांच्या सूट व्यतिरिक्त आकर्षक फायनान्स प्लॅन देखील देत आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी ही बाईक ५,५५५ च्या डाऊन पेमेंट वर ऑफर करत आहे. फक्त या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कंपनीचे आणि बँकेच्या अटी आणि शर्ती पूर्ण कराव्या लागतील. आणि त्यासाठी तुम्हाला ही बाईक प्री-बुक करावे लागेल.

आणखी वाचा : टोयोटानंतर आता मारुती सुझुकीही फ्लेक्स फ्युएलवर धावणार; २०२३ मध्ये होणार बाजारपेठेत दाखल !

किंमत

Star City Plus या बाईकची एक्स-शोरुम किंमत ७४,९९० रुपये एवढी आहे.

Star City Plus मायलेज

TVS Star City Plus या बाईकमध्ये ११० सीसी, सिंगल सिलेंडर, फ्यूल इंजेक्टेड इंजिन देण्यात आलं आहे. या बाइकचं इंजिन ७३५० आरपीएमवर ८.०८ बीएचपी पॉवर आणि ४५०० आरपीएमवर ८.७ न्युटन मीटर पीक टॉर्क जनरेट करू शकतं. यामध्ये ४ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाइकच्या स्पीडबद्दल बोलायचे झाल्यास ही बाइक ९० किमी प्रति तास इतक्या स्पीडने धावते.

Story img Loader