देशातील बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंकडे एकशे एक कार कलेक्शन आहेत. मात्र, आता त्यांच्याहीपेक्षा महागडी कार नुकतीच एका उद्योगपतीने खरेदी केली आहे. ‘McLaren 765 LT Spider’ ही देशातील सर्वात महाग सुपरकार असून या आता हा तरुण या सुपरकारचा मालक बनला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘या’ तरुणाने खरेदी केली ही महागडी कार
हैदराबादमधील बिझनेसमॅन नसीर खान यांनी McLaren 765 LT Spider खरेदी केली आहे. McLaren 765 LT Spider ही देशातील सर्वात महाग कार आहे. या सुपरकारची किंमत १२ कोटी रुपये आहे. नसीर खान हे हैदराबादचे मोठे उद्योगपती आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी भारतातील सर्वात महागडी सुपरकार मॅकलेरन 765 एलटी स्पायडर खरेदी केली आहे. नसीर खान यांना अलीकडेच ताज फलकनुमा पॅलेसमध्ये सुपरकारची डिलिव्हरी मिळाली. आता ते भारतातील McLaren 765 LT स्पायडरचे पहिले ग्राहक ठरले आहेत.
(हे ही वाचा: स्मार्टफोनपेक्षा कमी किमतीत घरी घेऊन या 80 kmpl माइलेजवाली ‘ही’ बाईक; जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर)
Mclaren 765LT Spider अशी आहे खास
ब्रिटीश मोटार रेसिंग कार उत्पादक मॅक्लारेनने (Mclaren) भारतात सर्वात महागडी कार लॉन्च केली. या महागड्या कारचे नाव Mclaren 765LT Spider आहे. जी भारतीय बाजारपेठेत सुपरकार म्हणून ओळखली जाते. मॅक्लेरेनच्या 765LT स्पायडर सुपरकारचे छप्पर फक्त ११ सेकंदात फोल्ड होते. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पॉवरसाठी यात ४.० लीटर ट्विन टर्बो चार्ज V8 पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. हे इंजिन ७६५ Ps आणि ८०० Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे ७-स्पीड अनुक्रमिक गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. कारला साइड स्कर्ट, अग्रेसिव्ह फ्रंट बंपर, रॅपराऊंड रिअर बंपर आणि स्प्लिटर मिळतील.
नसीर खान यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या नवीन सुपरकारचा फोटो अपलोड केला आहे. नसीर खान यांच्याकडे लग्झरी कार्सचा भला मोठा ताफा आहे. यात रोल्स रॉयस कुलिनन ब्लॅक, लॅम्बोर्गिनी हुराकेन, लॅम्बोर्गिनी ऊरूस, लॅम्बोर्गिनी अॅव्हेंटडोर, फोर्ड मस्टँग, फेरारी, जीएमसी सिएरा, मर्सिडीज बेन्झ एएमजी जी ६३, मर्सिडीज बेन्झ जी क्लाससह अनेक कारचा समावेश आहे. नसीर खान यांना वेगवेगळ्या कार संग्रह करून ठेवण्याचा छंद आहे. विशेष म्हणजे, ते नवीन कारसह फोटो अपलोड करत असतात.