संपूर्ण जगाचे लक्ष इलेक्ट्रिक वाहनांवर आहे. अशा परिस्थितीत, तेलंगणा सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हैदराबाद ई-मोबिलिटी सप्ताह सुरू करण्याची घोषणाही केली आहे.हा कार्यक्रम ५ ते ११ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.
‘या’ ठिकाणी होणार शो
हैदराबाद ई मोटर शो – 2023 हाइटेक्स प्रदर्शन केंद्रात आयोजित केला जाईल. यामध्ये, महिंद्राच्या पिनफैरिना बटिस्टा (Pininfarina Battista) पासून ते स्टेलांटिस NV वरून Citroen ची इलेक्ट्रिक कार eC3 लाँच करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
एवढेच नाही तर, मोटार शोमध्ये क्वांटम एनर्जीचे इलेक्ट्रिक वाहन प्लाझ्मा (2W) लाँच करण्याबरोबरच अर्बन स्फेअरद्वारे भारतातील पहिला अनोखा EV स्केटबोर्ड MULA (MULA) लाँच केला जाईल. तसेच हैदराबाद ई-प्रिक्स, भारतातील पहिली फॉर्म्युला ई-रेस, दोन दिवसांत होणार आहे.
(हे ही वाचा : यंदाच्या उन्हाळ्यात गर्मीला करा बाय-बाय; येतोयं सिंगल चार्जमध्ये १५० किमी रेंज देणारी ‘एसी इलेक्ट्रिक रिक्षा’)
यामध्ये भविष्यात लाँच होणारी इलेक्ट्रिक वाहने सादर केली जाणार आहेत. यासोबतच चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्वॅपिंग नेटवर्क तयार करण्यावरही चर्चा होणार आहे. याद्वारे सरकार देशात इलेक्ट्रिक वाहन क्रांतीचा प्रचार करणार आहे.
‘हे’ मान्यवर राहणार उपस्थित
हैदराबादसह बेंगळुरू आणि पुण्यातूनही स्वतंत्र रॅली निघाली आहे. यामध्ये ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल, महिंद्रा इलेक्ट्रिकचे सीईओ सुमन मिश्रा, अथरचे सह-संस्थापक तरुण मेहता आदी मान्यवर या परिषदेत उपस्थित राहणार आहेत.