Hydrogen Fuel Cell car: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी त्यांच्या कामामुळे अनेकदा चर्चेत असतात. पण अलीकडच्या काळात गडकरी एका खास कारणामुळे चर्चेत आहेत आणि ते कारण म्हणजे त्यांची कार आहे. जी हायड्रोजनवर चालणारी कार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मालकीची हायड्रोजनवर चालणारी कार टोयोटा मिराई आहे. हे वाहन टोयोटाने २०२२ मध्ये सादर केले होते. नितीन गडकरी ग्रीन हायड्रोजनच्या वापराला प्रोत्साहन देत आहेत कारण त्यांच्या मते हायड्रोजन हे भारताचे भविष्यातील इंधन आहे. यामुळेच नितीन गडकरी स्वतः हायड्रोजन कार चालवतात आणि लोकांना सांगतात की, पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या वाहनांचा मायलेज खूपच कमी असतो. चला तर जाणून घेऊया गडकरी यांची कार कशी आहे खास..

Toyota Mirai कशी आहे खास

टोयोटा मिराई कंपनीने अद्याप लाँच केलेली नाही. या हायड्रोजन कारचे चाचणी मॉडेल सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आहे, ज्यातून ते दररोज प्रवास करतात.

(हे ही वाचा : इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करताय? अर्थसंकल्पात मोदी सरकारने केली मोठी तरतूद; जाणून घ्या )

Toyota Mirai प्रकार
टोयोटाने आंतरराष्ट्रीय बाजारात हायड्रोजन कारचे तीन प्रकार सादर केले आहेत, परंतु कंपनी भारतीय बाजारपेठेसाठी किती प्रकार लाँच करणार आहे याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Toyota Mirai इंजिन आणि ट्रान्समिशन
टोयोटा मिराई ही हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञान असलेली सेडान कार आहे, ज्यामध्ये स्थापित इलेक्ट्रिक मोटर १८२ पीएस पॉवर आणि ४०६ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या मोटरसोबत कंपनीने १.२४ kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅकही दिला आहे.

Toyota Mirai ड्रायव्हिंग रेंज
टोयोटा मिराईमध्ये ५.२ किलो क्षमतेची हायड्रोजन टाकी आहे, जी एकदा पूर्ण झाल्यावर ६४६ किमीची ड्रायव्हिंग रेंज मिळते.

(हे ही वाचा : Auto Sales January 2023: टाटा मोटर्सच्या ‘या’ शानदार कारच्या मागे लागले भारतीय, विक्रीत केली रेकॉर्डब्रेक कामगिरी )

Toyota Mirai वैशिष्ट्ये
Toyota Mirai मध्ये १२.३-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जर, ८-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, हेड अप डिस्प्ले आणि डिजिटल रीअर व्ह्यू मिरर, इतर वैशिष्ट्यांसह आहेत.

Toyota Mirai सुरक्षा वैशिष्ट्ये
टोयोटा मिराईला ७ एअरबॅग्ज, हिल असिस्ट, ब्रेक असिस्ट, ईबीडीसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, तर टोयोटा मिराईला सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच लांब पल्ल्याच्या दृष्टीने मजबूत बनवले आहे.

Toyota Mirai किंमत
हायड्रोजन फ्युएल सेल असलेली इलेक्ट्रिक सेडान टोयोटा मिराईची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ६० लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने भारतातील त्याच्या किंमतीबाबत अद्याप काहीही खुलासा केलेला नाही.