Hyundai ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. जवळजवळ सर्व कंपन्या नवीन महिन्यात आपल्या महिन्यात झालेल्या गाड्यांच्या विक्रीची संख्या आणि मागील वर्षी त्याच महिन्यात झालेल्या विक्रीची संख्या याची माहिती देत असतात. ह्युंदाई कंपनीची मे २०२३ महिन्यातील विक्रीमध्ये १६.२६ टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीने एकूण किती युनिट्सची विक्री केली आहे ते जाणून घेऊयात.
ह्युंदाई कंपनीने मे २०२३ मध्ये एकूण विक्री झालेल्या वाहनांची संख्या रोल आऊट केली आहे. कंपनीने मे महिन्यात एकूण ५९,६०१ युनिट्सची विक्री केली आहे. ज्यामध्ये ४८,६०१ देशांतर्गत विक्री तर ११,००० युनिट्सची निर्यात करण्यात आली आहे. यंदाच्या तुलनेत मे २०२२ मध्ये कंपनीने ५१,२६३ युनिट्सची विक्री केली होती. यामध्ये ४२,२९३ युनिट्स देशांतर्गत आणि ८,९७० युनिट्सची निर्यात करण्यात आली होती. याबाबतचे वृत्त carwale ने दिले आहे.
Hyundai Exter
देशामध्ये कंपनीच्या सध्याच्या पोर्टफोलिओमध्ये आगामी एसयूव्ही Exter जुलै २०२३ मध्ये लॉन्च करण्याची तयारी करत आहे. Exter या एसयूव्हीला सात व्हेरिएंट आणि दोन पॉवरट्रेन पर्यायांमध्ये सादर केले जाणार आहे. ११ हजार रूपयांमध्ये या एसयूव्हीचे बुकिंग सुरू झाले आहे.
ह्युंदाई मोटर इंडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर तरुण गर्ग म्हणाले, ”आमच्या ब्लॉकबस्टर SUV मुळे मे २०२३ मध्ये दुहेरी अंकामध्ये झालेल्या विक्रीच्या वाढीबद्दल घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. यामध्ये सर्वात जास्त योगदान हे क्रेटा आणि व्हेन्यूचे आहे. तसेच नुकत्याच लॉन्च झालेल्या नवीन Hyundai VERNA ने देखील चांगली कामगिरी केलेली आहे. तर लवकरच आम्ही लॉन्च होणारी एसयूव्ही Hyundai EXTER ग्राहकांमध्ये उत्साह वाढवत आहे.”