भारतीय वाहन बाजारात एसयूव्ही कार्सना मोठी मागणी आहे. देशातली तिसरी सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी ह्युंदाई आता या सेगमेंटमध्ये कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आता एक लहान एसयूव्ही लाँच करणार आहे. ही लहान एसयूव्ही कंपनीच्या Grand i10 च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. या लहान एसयूव्हीचे लाँचिंग पुढील वर्षी केले जाऊ शकते, अशी माहिती आहे. ही कार बाजारात दाखल झाल्यानंतर टाटा मोटर्सच्या टाटा पंच या गाड्यांशी स्पर्धा करेल.
लहान एसयूव्हीची वैशिष्ट्ये
नवीन लहान एसयूव्हीला ‘Ai3’ कोड नाव देण्यात आले आहे. मस्क्युलर स्टाइलिंग आणि पुरेसा ग्राउंड क्लीयरन्स ही या लहान एसयूव्हीची दोन प्रमुख वैशिष्ट्ये असतील.
आणखी वाचा : Tata Blackbird SUV ‘या’ दिवशी लाँच होणार; क्रेटा आणि वेन्यूला देणार टक्कर, जाणून घ्या फीचर्स…
हे जागतिक बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या कंपनीच्या Hyundai Casper सारखे असू शकते. Hyundai Casper ची लांबी ३,५९५ एमएम, रुंदी 1१,५९५ एमएम आणि उंची १,५७५एमएम आहे आणि तिचा व्हीलबेस २.४ मीटर आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Hyundai Casper मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, बिग टचस्क्रीन, सात एअरबॅग्ज आणि ADAS सारखी वैशिष्ट्ये आहेत.
कंपनीची ही कार भारतातील ह्युंदाईची सर्वात स्वस्त एसयूव्ही असेल. यात १.२ लीटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते, जे आधीपासून Grand i10 NIOS आणि Aura मध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन ८३PS पॉवर आणि ११४ एनएम टॉर्क जनरेट करते.