कारनिर्मिती क्षेत्रातील नामवंत कंपनी म्हणजे ह्युंदाई. मागील महिन्यात या कंपनीने निर्यातीसह तब्बल ५०,००० कारच्या विक्रीची नोंद केली होती. येत्या आठवड्यात आपल्या न्यू जेन ट्युक्सन सह ह्युंदाई पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी एक नवी कोरी निर्मिती घेऊन येत आहे. मात्र या सगळ्या दरम्यान कंपनीचे नाव एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. ह्युंदाई कंपनीला नुकतेच गुजरात राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगातर्फे आपल्या एका ग्राहकाला तब्बल १.२५ लाखाची नुकसान भरपाई द्यावी लागली. प्राप्त माहितीनुसार ह्युंदाई कार मालक आणि कंपनीमधील हा वाद ११ वर्षांपासून सुरू होता. अखेरीस आता या कार मालकाला आपली नुकसान भरपाई मिळाली आहे. आता नेमका हा वाद कशावरून होता हे जाणून घेऊयात..

गुजरातमधील साबरमती येथील रहिवासी अभय कुमार जैन यांनी २०१० मध्ये ह्युंदाईची हॅचबॅक कार खरेदी केली होती जिचा २०११ मध्ये अपघात झाला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवासी गंभीर जखमी झाले होते. ऐन वेळी कार मधील एअरबॅग न उघडल्याने अपघातात अधिक नुकसान झाल्याची तक्रार अभय यांनी केली. या प्रकरणी विमा कंपनीकडून अभय यांना २.७५ लाखाची भरपाई देण्यात आली मात्र सर्वेक्षणात एअरबॅग मधील दोषही समोर आला.

Optibike R22 Everest: एका चार्जिंग मध्ये 483km धावणार, ऑप्टी बाईक आर 22 एव्हरेस्ट चे भन्नाट फीचर व किमंत जाणून घ्या

अपघातानंतर अभय यांनी अहमदाबाद येथील कोर्टात डीलरविरोधात याचिका दाखल केली होती मात्र हे सर्वेक्षण फोल असल्याचा दावा करत उलट ड्रायव्हरने सीटबेल्ट लावलेला नसेल, ज्यामुळे एअरबॅग ओपन झाली नाही असा पलटवार डिलरने केला.

याविषयी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक एअरबॅग्समध्ये ग्वानिडाइन नायट्रेट नावाचे प्रज्वलन करणारे संयुग असते. हे प्रभावाच्या 2 मिलीसेकंदमध्ये सक्रिय होतात, ज्यामुळे नायट्रोजन वायूंचा विस्तार होतो आणि 20 ते 30 मिलिसेकंदांमध्ये एअरबॅग उघडते. नायट्रोजन वायू 230 किमी प्रतितास वेगाने विस्तारतात. बहुतेक कारमध्ये, सीट बेल्ट बांधलेले नसल्यास एअरबॅग उघडत नाहीत. सीटबेल्ट्स एअरबॅगच्या जवळ येण्यापासून रोखण्यासाठी थोडासा विलंब होतो. अन्यथा, प्रत्यक्ष अपघातापेक्षा एअरबॅगला आदळल्याने प्रवाशांना जास्त इजा होऊ शकते. प्रवाशांच्या संरक्षणासाठी सीटबेल्ट बांधलेले नसताना एअरबॅग्ज खोलू नये असा सल्ला दिला जातो. मात्र हेच कारण ह्युंदाई प्रकरणी लागू होते का याबाबत ठोस उत्तर अद्याप मिळालेले नाही.