Hyundai cars: ह्युंदाई मोटर कंपनीच्या गाड्या भारतीय बाजारपेठांमध्ये सर्वाधित पसंत केल्या जातात. या कंपनीद्वारे निर्मित मोठ्या आकाराच्या गाड्यांची देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. पण प्रत्येकला क्रॉसओव्हर्स किंवा एसयूव्ही परवडेलच असे नाही. काही ग्राहकांना आकाराने लहान असलेल्या गाड्या चालवायला आवडतात. छोट्या गाडीमध्ये चौकोनी कुटुंब मावते. लहान गाडी घेण्याचा मानस असणाऱ्या ग्राहकांसाठी ह्युंदाईने मोठी घोषणा केली आहे.
Kona (कोना) ही ह्युंदाई कंपनीची नवी गाडी लवकरच बाजारामध्ये लॉन्च केली जाणार आहे. या निमित्ताने कंपनीने एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये कंपनीच्या युरोपियन विभागाचे प्रमुख मायकेल कोल यांनी ह्युंदाई कंपनी i10, i20 आणि i30 या कलेक्शनमधील नव्या छोट्या आकाराच्या गाड्यांचे मॉडेल्स भविष्यामध्ये लॉन्च करणार असल्याची घोषणा केली. आम्ही सध्या दीर्घकालीन योजनांवर लक्ष देत आहोत. पुढच्या पिढीसाठी आम्ही हे कलेक्शन आणणार आहोत. आम्हाला प्रत्येक ग्राहक वर्गासाठी गाड्या तयार करायच्या आहेत असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा – जगभरात २०२२ मध्ये १.२ कोटी ‘ईव्हीं’ची विक्री
ते पुढे म्हणाले, युरोपमध्ये २०३५ पर्यंत गाड्यांद्वारे शून्य उत्सर्जन व्हावे यासाठी आत्तापासून नियम तयार करण्यात आले आहेत. हळहळू या नियमांमध्ये वाढ झाल्याने काही वर्षांनी कॉम्पॅक्ट गाड्यांना इव्ही (Electric vehicle) मध्ये रुपांतरीत करणे आवश्यक असणार आहे. या नियमांमुळे ह्युंदाईच्या नव्या i10, i20 आणि i30 मॉडेल्सची निर्मिती करताना अडचणी येऊ शकतात. पण त्याला अजून बराच वेळ शिल्लक आहे.
आणखी वाचा – कार चालवताना AC सुरु ठेवल्यास पेट्रोल, डिझेल लवकर संपते का? जाणून घ्या सविस्तर
या दशकाच्या उत्तरार्धामध्ये युरो ७ नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या नियमांमुळे लहान आकारांच्या गाड्यांच्या वापरावर निर्बंध येऊ शकतात किंवा त्यांचे रुपांतर ईव्हीमध्ये करावे लागू शकते. भविष्यातील ही स्थिती ओळखून मुख्य प्रवाहातील अनेक ऑटोमेकर कंपन्यांनी सबकॉम्पॅक्ट आणि कॉम्पॅक्ट गाड्यांची निर्मिती कमी प्रमाणामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी स्थिती असताना ह्युंदाईने घेतलेल्या या निर्णयाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.