Hyundai कंपनी एक कार उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन कार्स भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत असते. Hyundai Motor कंपनीने Auto Expo २०२३ मध्ये Ioniq 5 ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्यानंतर लगेचच त्यांनी नवीन सिरीजच्या Verna sedan साठीचे बुकिंग सुरु केले आहे. ग्राहकांसाठी याचे बुकिंग सुरु करण्यात आले आहे. हे एक आगामी सेडानचे मॉडेल आहे. कंपनी हे मॉडेल नवीन स्टायलिंग थीमसह लॉन्च करणार आहे. यामध्ये अनेक नवीन बदल व फीचर्स कंपनीकडून देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Verna sedan च्या आतील आणि बाहेरील डिझाईनमध्ये बदल करण्यात येणार आहेत. इंटिरिअरबद्दल बोलायचे झाल्यास आगामी Verna मोठ्या टचस्क्रीन डिस्प्ले आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कारला अधिक प्रीमियम लुक मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास नवीन १.५ टर्बो GDi पेट्रोल इंजिन मिळणार आहे. ज्यात ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन (6MT) आणि 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन (7DCT) सह असणार आहे. नवीन Verna मधील नवीन 1.5L टर्बो इंजिन लवकरच Creta मध्ये देखील दिसणार आहे.

2023 Hyundai Verna – संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

हेही वाचा : GT Battista: महिंद्राने लाँच केली जगातील सर्वात वेगवान कार; अवघ्या दोन सेकंदात मिळतो ‘इतका’ स्पीड

न्यू जनरेशन Hyundai Verna चार ट्रिम्स EX, S, SX आणि SX(O) मध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. यामध्ये ग्राहकांना Abyss Black (नवीन), Atlas White (नवीन), Tellurian Brown या रंगांमध्ये खरेदी करता येणार असून याचे उत्पादन पुढील महिन्यापासून सुरु होणार असून लवकरच हे मॉडेललॉन्च केले जाणार आहे.

verena चे नवीन मॉडेल लवकरच लॉन्च होणार असून याचे बुकिंग सुरु झाले आहे. या मॉडेलमध्ये इंजिन लाईनप , इंटिरिअर देखील बदलले जाणार आहे. ग्राहक २५,००० रुपयांमध्ये Hyundai Verna चे बुकिंग करू शकणार आहेत.