Hyundai Motors: ह्युंदाई मोटर इंडिया कंपनी भारतीय वाहन बाजारातली दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. ह्युंदाईच्या बेस्ट सेलिंग कारबद्दल बोलायचे झाल्यास हा मान ह्युंदाई क्रेटाला मिळाला आहे. ही कार तिच्या डिझाइन आणि वैशिष्ट्यांमुळे पसंत केली जाते. जर तुम्हाला ह्युंदाई कंपनीची ‘Hyundai Creta’ ही कार खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला ही कार तुमच्या बजेटमध्ये कशी खरेदी करता येईल, याविषयी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल.
Hyundai Creta Base Model किंमत
Hyundai Creta च्या किमती बेस मॉडेलसाठी १, ०४३,९९९ रु. (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होतात आणि ऑन-रोड १२,१०,०१५ रु. पर्यंत जातात. जर तुमच्याकडे ही SUV खरेदी करण्यासाठी इतके मोठे बजेट नसेल किंवा तुम्हाला एवढी मोठी रक्कम एकत्र खर्च करायची नसेल, तर ही कार खरेदी करण्याची सोपी फायनान्स योजना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
(हे ही वाचा : २५ हजारामध्ये खरेदी करा ८० kmpl पर्यंत मायलेज देणारी ‘ही’ जबरदस्त बाईक; पाहा कुठे मिळतेय शानदार डील )
Hyundai Creta Base Model Finance Plan
ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटर नुसार फायनान्स प्लॅनचे तपशीलवार, तुमचे बजेट १ लाख रुपये असल्यास बँक तुम्हाला या SUV साठी ११,१०,०१५ रुपये कर्ज देऊ शकते. या कर्जाच्या रकमेवर बँक वार्षिक ९.८ टक्के व्याज आकारेल.
एकदा ह्युंदाई क्रेटा बेस मॉडेलसाठी कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला एसयूव्हीसाठी १ लाख रुपये डाउन पेमेंट करावे लागेल आणि त्यानंतर बँकेने ठरवल्यानुसार ५ वर्षांच्या कालावधीसाठी २३,४७५ रुपये प्रति महिना EMI भरावे लागेल.