Hyundai Creta EV:  सध्या भारतासह जगभरात इलेक्ट्रीक कारचा ट्रेंड वाढतोय. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता ग्राहक इलेक्ट्रीक कारला पसंती देत आहेत. यामुळे अनेक कंपन्या खास फिचर्ससह मॉडेल्स सातत्याने लाँच करत आहेत. यात आता टाटा इलेक्ट्रिकला चक्कर देणयासाठी लवकरचं ह्युंदाई कंपनीची क्रेटा इलेक्ट्रिक एसयूव्ही कार भारतीय बाजारात लाँच होणार आहे.

या इलेक्ट्रिक कारची बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा होती कंपनी गेल्या काही दिवसांपासून या कारचे टीझर रिलीज करत होती. पण अखेर कंपनीने अधिकृत फोटोंसह कारविषयीचे तपशील शेअर केले आहेत.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
bahubaliche beed loksatta article
बाहुबलीचे बीड : ‘विहिरी’तील कोट्यवधींच्या घबाडावर बाहुबली गब्बर,…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
MLA Satej Patil On Madhurima Raje
Satej Patil : Video : मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटलांना अश्रू अनावर; म्हणाले, “उद्या योग्य तो निर्णय…”
Mukesh Chandrakar Murder Case.
Mukesh Chandrakar : पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येतील आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई, छत्तीसगड सरकारचा आक्रमक पवित्रा
rahul gandhi 10 janpath house
“माझ्या वडिलांचं इथेच निधन झालं, त्यामुळे या घराचा…”, राहुल गांधींनी १०, जनपथबाबत केलं विधान!
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 : कमला हॅरीस यांचा पराभव, रात्रीचं भाषणही रद्द!

नवीन Hyundai Creta Electric कार १७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये विक्रीसाठी लाँच केली जाईल. त्याचवेळी त्याच्या किमतीही जाहीर केल्या जाऊ शकतात. चला तर मग पाहूया क्रेटा इलेक्ट्रिक कार नेमकी कशी आहे, त्यात नेमके कोणते नवीन फिचर्स देण्यात आले आहेत.

डिझाइनसंदर्भात बोलायचे झाल्यास, Hyundai Creta Electric ही कार ICE-पावर्ड (पेट्रोल-डिझेल) मॉडेलसारखीच आहे. बहुतांश बॉडी पॅनल्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यात फक्त नवीन सॉफ्ट प्लास्टिकचे पार्ट्स दिसतात. यामध्ये पिक्सेलसारख्या डिटेलिंगसह नवीन फ्रंट आणि रियर बंपर आहेत.

कारमध्ये नवीन एरो-ऑप्टिमाइज्ड अलॉय व्हील्स

याशिवाय, इलेक्ट्रिक कारसारखे पारंपरिक कवर्ड फ्रंट ग्रिल आहे. तसेच त्यात नवीन एरो-ऑप्टिमाइज्ड अलॉय व्हील्सचा समावेश करण्यात आला आहे. फ्रंट बंपर हा N Line व्हेरियंटची अधिक आठवण करून देणारा आहे. या कारमध्ये चार्जिंग पोर्ट फ्रंट साईडला देण्यात आला आहे. कारवाले वेबासाईटच्या माहितीनुसार, या कारची शोरुम किंमत २२ ते २६ लाखदरम्यान असेल.

कारमध्ये सेन्सर बेस्ड डिजिटल की

कंपनीने Hyundai Creta EV मध्ये अॅडव्हान्स टेक्नॉलॉजिचा वापर केला आहे. त्यात सेन्सर बेस्ड डिजिटल की उपलब्ध असेल. जी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करुन सहजपणे ऑपरेट करू शकाल. याआधीही हे तंत्रज्ञान इतर अनेक कारमध्ये वापरले गेले आहे.

कारच्या आतील बाजूस, क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये ड्युअल 10.25-इंच स्क्रीन सेटअप आहे. याशिवाय जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या कोना इलेक्ट्रिकपासून प्रेरित असलेले स्टीयरिंग व्हील देण्यात आले आहे. याला नवीन फ्लोटिंग सेंटर कन्सोल डिझाइन मिळते.

रॉयल एनफिल्डचा मोठा धमाका! पहिली 750 cc इंजिन बाईक लवकरच इंडियन मार्केटमध्ये करणार एन्ट्री; पाहा जबरदस्त फीचर्स

कंपनीने Creta EV मध्ये तीन वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड दिले आहेत ज्यात Eco, Normal आणि Sport यांचा समावेश आहे. यात स्टीयरिंग कॉलम-माउंटेड ड्राइव्ह मोड सिलेक्टर आहे, जो Ioniq 5 सारखा आहे. Hyundai चा दावा आहे की, क्रेटा इलेक्ट्रिक (लाँग रेंज) कार ७.९ सेकंदात ० ते १०० किमी/ताशी वेग धावू शकते.

hyundai creta electric features specifications and price google trends
ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक एसयूव्ही किंंमत गुगल ट्रेंड

लॅपटॉप, मोबाईल चार्जसाठी देण्यात आलेत सीटवर सॉकेट

कंपनी या इलेक्ट्रिक SUV मध्ये व्हेइकल-टू-लोड (V2L) फीचर देखील देत आहे. याच्या मदतीने तुम्ही त्याच्या बॅटरीमधून इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांनाही पॉवर करू शकता. मागील सीटवर सॉकेट दिले जात आहे. त्याला कनेक्ट करून तुम्ही तुमचा लॅपटॉप वगैरे चार्ज करू शकता.

क्रेटा इलेक्ट्रिक दोन बॅटरी पॅक ऑप्शनमध्ये येत आहे. ज्यामध्ये 42kWh आणि 51.4kWh बॅटरीचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की, त्याचा छोटा बॅटरी पॅक (42kWh) एका चार्जमध्ये ३९० किमीची रेंज देईल. मोठा बॅटरी पॅक (५१.4kWh) व्हेरिएंट एकदा चार्ज केल्यानंतर ४७३ किमीची रेंज देईल. कंपनी या एसयूव्हीच्या रेंजला आणखी अपडेट करु इच्छिते.

Hyundai चा दावा आहे की, क्रेटा इलेक्ट्रिक फक्त ५८ मिनिटांत १० टक्के ते ८० टक्के चार्ज होऊ शकते (DC चार्जिंग), तर ११ kW AC वॉल बॉक्स चार्जर ४ तासांत १० टक्के ते १०० टक्के चार्ज होऊ शकतो.

Creta EV मध्ये पॅनोरामिक सनरूफ

कंपनी Creta EV मध्ये पॅनोरामिक सनरूफ देखील देत आहे. त्याचा टीझर बघून असा अंदाज वर्तवला जात आहे की, २६ जानेवारीपासून कारचे बुकिंग सुरू होईल किंवा किंमती जाहीर केल्या जातील.

क्रेटा इलेक्ट्रिक ४ व्हेरियंट्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल – एक्झिक्युटिव्ह, स्मार्ट, प्रीमियम आणि एक्सलन्स. ही SUV ८ मोनोटोन आणि २ ड्युअल-टोन कलर ऑप्शनसह ऑफर केली जात आहे. ज्यामध्ये ३ मॅट रंगांचाही समावेश आहे.

hyundai creta electric features specifications and price google trends
ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक एसयूव्ही किंंमत गुगल ट्रेंड

कंपनी बऱ्याच दिवसांपासून Hyundai Creta Electric वर काम करत होती.ही कार वेगवेगळ्या प्रसंगी अनेकदा स्पॉट झाली आहे. बाजारात ही कार मारुतीची आगामी इलेक्ट्रिक कार e Vitara, Mahindra BE 6, Tata Curve EV सारख्या कारशी थेट स्पर्धा करेल. आता कंपनी या कारची किंमत काय ठरवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Story img Loader