Hyundai Creta EV: Hyundai Motor India १७ जानेवारीला भारतात क्रेटा इलेक्ट्रिक लाँच करणार आहे. ह्युंदाईला आशा आहे की, नवीन मॉडेल कार मार्केटमध्ये खळबळ माजवू शकेल. डिझाइनपासून ते फीचर्स आणि रेंजपर्यंत अनेक माहिती समोर आली आहे. या वाहनात एक खास फीचरदेखील समाविष्ट करण्यात आले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही नवीन Creta EV सह चहा किंवा कॉफी बनवू शकता आणि गरज भासल्यास तुमचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर महत्त्वाचे गॅझेटदेखील चार्ज करू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये स्थापित व्हेईकल टू लोड (V2L) फीचरच्या मदतीने हे शक्य होईल. जे हे वाहन लांबच्या प्रवासाला घेऊन जातील, त्यांना हे V2L फीचर खूपच आवडेल. हे फीचर Tata Nexon EV मध्येही बघायला मिळते.

हेही वाचा… HONDA ची बम्पर ऑफर! नववर्षात ‘या’ ३ गाड्यांवर ९०,००० पर्यंत डिस्काउंट, होईल पैशांची बचत

Creta EV : रेंज आणि फीचर्स

नवीन Creta EVला दोन बॅटरी पॅकचा पर्याय दिला जाईल, ज्यामध्ये त्याला 51.4kWh चा बॅटरी पॅक मिळेल आणि सिंगल चार्जवर 472km ची रेंज मिळेल आणि आणखी 42kWh चा बॅटरी पॅक मिळेल, जो सिंगल चार्जवर 390 किमी. रेंज ऑफर करेल. १०% -८०% पासून चार्ज होण्यासाठी ५८ मिनिटे लागतील. मात्र, यासाठी डीसी चार्जिंगची मदत घ्यावी लागणार आहे. तर, एसी होम चार्जिंगच्या मदतीने १०% ते १००% चार्ज होण्यासाठी चार तास लागतील. ही कार फक्त ७.९ सेकंदांत ०-१०० किमी/ताशी वेग पकडू शकते.

हेही वाचा… दिशा पाटनीने विकत घेतली नवीन रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी, किंमत ऐकून व्हाल अवाक

सूत्रानुसार, नवीन Creta EV मध्ये १०.२५ इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, १०.२५ इंच इन्फोटेन्मेंट सिस्टीम, पॅनोरॅमिक सनरूफ, हवेशीर फ्रंट सीट, की-लेस एंट्री, रिअर AC व्हेंट्स, वायरलेस फोन चार्जर यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. सुरक्षेसाठी एसयूव्हीमध्ये सहा एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंगसह EBD, ADAS लेव्हल २, ABS, EBD, हिल होल्ड असिस्ट व ESP सारखी फीचर्स पाहता येतील.

पॅनोरॅमिक सनरूफ, हवेशीर फ्रंट सीट, की-लेस एंट्री, मागील एसी व्हेंट्स, वायरलेस फोन चार्जर यांसारख्या फीचर्सचा नवीन Creta EV मध्ये समावेश केला जाईल. कंपनी या गाडीला २० लाख रुपयांच्या आत लाँच करू शकते. आता भारतात त्याला कितपत यश मिळते हे पाहावे लागेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyundai creta ev feature make tea or coffee charge gadgets in this car with v2l feature dvr