दक्षिण कोरियन कंपनी Hyundai कंपनीच्या कार सध्या भारतात सर्वाधिक विकल्या जातात. नवीन कार बाजारपेठेत लाँच होताच कारची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. Hyundai Creta या कारला ग्राहकांची तुफान मागणी असते. जबदस्त फीचर्स आणि लूक पाहून या कारची विक्री देशात चांगलीच होत असते. आता नुकतेच कंपनीने 2024 Hyundai Creta ची नवीनतम फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केलं आहे. मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये येणाऱ्या या कारबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
अशी माहिती आहे की, ग्राहकांना 2024 Hyundai Creta चे फेसलिफ्ट व्हर्जन खूप आवडले आहे. कंपनीने बुकिंग्सच्या लेटेस्ट डेटाची माहिती दिल्यानुसार, तीन महिन्यांच्या आतच या कारला १ लाख यूनिटपेक्षा जास्त बुकिंग मिळाली आहे. ग्राहकांनी सनरूफ आणि कनेक्टेड कारचे फिचर्स सर्वाधिक पसंत केले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कारमध्ये दिलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षा वैशिष्ट्ये, परफॉर्मन्स, आराम आदींसह अनेक वैशिष्ट्यांमुळे ही कार लोकांच्या पसंतीस उतरली आहे.
(हे ही वाचा : Baleno, Brezza, Nexon, Creta नव्हे तर ‘या’ ५.५४ लाखाच्या हॅचबॅक कारसाठी ग्राहकांच्या लागल्या रांगा, झाली तुफान विक्री )
कंपनीच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना सनरूफ व्हेरियंट्स सर्वाधिक पसंत पडत आहेत. कंपनीला मिळालेल्या एकूण बुकिंगपैकी ७१ टक्के बुकिंग सनरूफ वैशिष्ट्यासाठी आहेत, तर ५२ टक्के बुकिंग कनेक्टेड कार प्रकारांसाठी आहेत. कंपनीने कारमध्ये लेव्हल 2 ADAS ही प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये दिली आहेत. कारमध्ये ३६ मानक सुरक्षा वैशिष्ट्ये आणि ७० हून अधिक प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत.
Hyundai Creta फेसलिफ्ट जानेवारी २०२४ मध्ये ११ लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली होती. त्याच्या टॉप मॉडेलची किंमत २०.१५ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. ही कार अनेक प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
क्रेटा फेसलिफ्ट तीन प्रकारच्या पॉवरट्रेनसह सादर करण्यात आली आहे. ज्यामध्ये पहिले १.५-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल, दुसरे १.५-लिटर टर्बो-पेट्रोल आणि तिसरे १.५-लिटर डिझेल इंजिन समाविष्ट आहे. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ६-स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड iMT, ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर, CVT आणि ७-स्पीड DCT गिअरबॉक्स समाविष्ट आहे.