Mid Size SUV Sales: भारतात कार विक्रीसाठी मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा मोटर्समध्ये युद्ध सुरू आहे. पहिल्या क्रमांकावर मारुती सुझुकी, दुसऱ्या क्रमांकावर ह्युंदाई आणि तिसऱ्या क्रमांकावर टाटा मोटर्स आहे. एसयूव्हीच्या विक्रीवरूनही या तीन कंपन्यांमध्ये युद्ध सुरू आहे. मारुती सुझुकीची ब्रेझा ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे. त्याचवेळी, Hyundai Creta ने विक्रीचा असा विक्रम केला आहे की तिने मारुती आणि टाटा मोटर्सला पराभूत केले आहे. मार्चमध्ये मारुती ब्रेझा नंतर, मध्यम आकाराच्या एसयूव्हीच्या बाबतीत Hyundai Creta ने प्रथम क्रमांकाचा दर्जा प्राप्त केला आहे. या महिन्यात, Hyundai Creta विक्रीत ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मारुती-टाटाला टाकलं मागे
Hyundai Creta ही मध्यम आकाराची SUV आहे, जी बाजारात खूप लोकप्रिय आहे. त्याची विक्री मारुती आणि टाटा मोटर्सच्या विक्रीपेक्षा जास्त आहे. ही मार्च महिन्यात भारतात सर्वाधिक विकली जाणारी मध्यम आकाराची एसयूव्ही आहे. मार्चमध्ये क्रेटाच्या १४,०२६ युनिट्सची विक्री झाली. या विभागात टाटा मोटर्सकडे टाटा हॅरियर आहे आणि मारुतीकडे ग्रँड विटारा एसयूव्ही आहे. पण क्रेटाची विक्री पाहता ह्युंदाईने टाटा आणि मारुती या दोन्ही वाहनांना मागे टाकले आहे. उदाहरणार्थ, मारुती ग्रँड विटाराने १०,०४५ युनिट्स विकल्या तर टाटा हॅरियरने फक्त २,५६१ युनिट्स विकल्या. Tata Harrier आणि Hyundai Creta च्या विक्रीत ११ हजारांहून अधिक युनिट्सचा फरक आहे.
(हे ही वाचा : आता कारमध्ये बसून गगन भरारीचा आनंद घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण, आली Flying Car, लायसन्सची गरज नाही, किंमत…)
Hyundai Creta ची वैशिष्ट्ये
Hyundai Creta ची किंमत १०.८७ लाख रुपये ते १९.२० लाख रुपये, एक्स-शोरूम दिल्ली आहे. यामध्ये १.५L पेट्रोल (११५PS आणि ११४Nm) आणि १.५L डिझेल (११५PS आणि २५०Nm) असे दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय, यात १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ७-इंच सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग, पॉवर-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि हवेशीर फ्रंट सीट्स यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.