लोकप्रिय एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाचे यश पाहिल्यानंतर कंपनी एक नवीन आवृत्ती लाँच करणार आहे. या गाडीचं नाव क्रेटा नाईट एडिशन आहे. कंपनी या एसयूव्हीमध्ये सध्याच्या क्रेटापासून एक्सटीरियर, इंटीरियर तसेच इंजिनमध्ये अपडेट करणार आहे. जर तुम्ही देखील ह्युंदाई क्रेटाच्या नवीन आवृत्तीच्या लाँचची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कंपनी कोणत्या नवीन अपडेट्ससह बाजारात गाडी लाँच करणार आहे, याबाबत माहिती जाणून घेऊ शकता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या एसयूव्हीमध्ये सर्वात मोठे अपडेट त्याच्या इंजिनमध्ये केले जाऊ शकते. या एसयूव्हीमध्ये कंपनी दोन इंजिनांचा पर्याय देणार आहे, ज्यामध्ये पहिले इंजिन १.५ लीटर पेट्रोल इंजिन असेल. हे इंजिन ११५ पीएस पॉवर आणि १४४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यातील दुसरे इंजिन १.५ लिटर टर्बो डिझेल इंजिन असेल जे ११५ पीएस पॉवर आणि २५० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या दोन्ही इंजिनसह ५-स्पीड एएमटी आणि सीव्हीटी ट्रान्समिशनचा पर्याय दिला जाऊ शकतो. याशिवाय, कंपनी ह्युंदाई क्रेटा नाईट एडिशनमध्ये पहिला प्रकार S+ आणि दुसरा SXO असणार आहे. यामध्ये नवीन ट्राय बीम एलईडी हेडलॅम्प, अलॉय व्हील, पॅनोरामिक सनरूफ यांसारखे फीचर्स अपडेट करण्यात आले आहेत.

Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
New Car Launch Tata launches Tiago and Tigor in 2025
५ लाखांत टाटाने लाँच केली नवी कार! अपडेटेड Tiago आणि Tigor चे फीचर्स एकदा बघाच; थेट Marutiला देत आहे टक्कर
International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….
Tula Shikvin Changalach Dhada Promo
अक्षराच्या माहेरी पोहोचली भुवनेश्वरी! अधिपतीला फोन केला अन् सुनेला दिलं खुलं आव्हान…; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Paaru
Video: संक्रातीच्या मुहुर्तावर सारंग-सावलीचे नाते फुलणार तर पारूवर येणार नवीन संकट, पाहा प्रोमो
hyundai creta electric features specifications and price in marathi
TATA ला टक्कर देणार Hyundai ची ‘Creata Electric’ कार! फक्त ५८ मिनिटांत चार्ज अन् 473 KM रेंज! जाणून घ्या फिचर्स अन् किंमत
Kia Syros Bookings Start Tonight
Kia Syros : थ्री इंजिन पर्याय, ॲडजस्टेबल व्हेंटिलेटेड सीट्स अन् बरेच काही; टोकन रक्कम भरून आजच बुक करा ‘ही’ एसयूव्ही

मर्सिडीजने २०२१-२०२२ दरम्यान विकलेल्या काही गाड्या परत मागवल्या, कारण…

ह्युंदाई क्रेटा नाईट एडिशनमध्ये, कंपनीने केबिनमध्ये मोठा बदल केला आहे. यात सर्व ब्लॅक इंटीरियर कलर थीम वापरण्यात आली आहे. या नाईट एडिशनमध्ये अद्ययावत एसी व्हेंट्स हायलाइट करण्यात आले आहेत. तसेच दिलेल्या आसनांवर वेगवेगळ्या रंगांची स्टिचिंग केली आहे. ह्युंदाई क्रेटा नाईट एडिशनमध्ये अपडेट करताना, मागील आणि समोरच्या स्किड प्लेट्सना ग्लॉस फिनिश देण्यात आला आहे. तसेच, सी पिलरवर लाइटिंग आणि फ्रंट ग्रिलवर पेंडंट ग्लॉस ब्लॅक कलरसह अपडेट केले गेले आहेत. कंपनीने या कारच्या किंमतीबाबत कोणतीही घोषणा केली नसली तरी तज्ज्ञांच्या मते, कंपनी या ह्युंदाई क्रेटा नाईट एडिशनची सुरुवातीची किंमत १३.५० लाख रुपये (एक्स-शोरूम) सह लॉन्च करेल.

Story img Loader