Hyundai Creta EMI Calculator: Hyundai Creta ही अशीच एक SUV आहे, जी भारतीय बाजारपेठेत दीर्घकाळ राज्य करत आहे. ही कंपनीची कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे, जी २०१४ मध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आली होती. त्याचे दुसरे जनरेशन मॉडेल २०२० मध्ये आणले गेले, त्यानंतर त्याची विक्री आणखी वाढली. क्रेटा स्टायलिश डिझाइन, प्रशस्त इंटिरियर आणि विश्वसनीय कामगिरीसाठी ओळखली जाते. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. येथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, तुम्ही ही SUV फक्त ४ लाख रुपयांमध्ये घरी कशी खरेदी करता येईल.
Hyundai Creta किंमत
Hyundai Creta SUV ची किंमत १०.८४ लाख ते १९.१३ लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. तथापि, रस्त्यावरील किंमत आणखी वाढेल. हे एकूण सात ट्रिममध्ये विकले जाते. यात E, EX, S, S+, SX एक्झिक्युटिव्ह, SX आणि SX(O) चा समावेश आहे. Hyundai Creta ६ मोनोटोन आणि १ ड्युअल-टोन कलर पर्यायामध्ये ऑफर केली आहे. ही ५ सीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे, जी मोठ्या बूट स्पेस देते. जर तुम्हाला ही कार लोनवर घ्यायची असेल, तर तुम्ही ४ लाख रुपये भरूनही ती स्वतःची बनवू शकता. येथे आम्ही त्याच्या EMI चे संपूर्ण गणित घेऊन आलो आहोत.
(हे ही वाचा: धमाकेदार आॅफर! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर मोफत थायलंड फिरण्याची संधी, अन् ५ हजारांपर्यंत कॅशबॅक )
४ लाखात Hyundai Creta घरी आणा
जर तुम्ही कारच्या बेस व्हेरिएंट (ई पेट्रोल) साठी गेलात तर तुम्हाला रोडवर १२.५४ लाख रुपये मोजावे लागतील. आता आपण असे गृहीत धरू की आपण हे प्रकार कर्जावर खरेदी करत आहात. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की तुम्ही तुमच्या आवडीनुसार अधिक डाउन पेमेंट देऊ शकता, वेगवेगळ्या बँकांमध्ये व्याजदर वेगवेगळा असतो आणि कर्जाचा कालावधी १ ते ७ वर्षे देखील निवडला जाऊ शकतो.
उदाहरणार्थ, ४ लाख रुपयांचे डाउन पेमेंट, १० टक्के व्याजदर आणि कर्जाची मुदत ५ वर्षे गृहीत धरू. अशा परिस्थितीत, तुम्हाला दरमहा १८,१४७ रुपये EMI भरावे लागेल. तुम्हाला एकूण कर्जाच्या रकमेसाठी (रु. ८.५४ लाख) अतिरिक्त २.३४ लाख रुपये द्यावे लागतील.