Hyundai ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनी १० जुलै रोजी भारतामध्ये आपली मायक्रो SUV Exter लॉन्च करणार आहे. Exter एसयूव्ही लॉन्च करून कंपनी एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करेल. Exter ला Hyundai पोर्टफोलिओमधील सर्वात स्वस्त SUV म्हणून Venue च्या खालचे स्थान दिले जाईल. यामध्ये दिलेल्या फीचरबद्दल बोलायचे झाल्यास Exter मध्ये टाटा पंचशी स्पर्धा करण्याची क्षमता आहे की नाही ते जाणून घेऊयात.
Exter चे इंजिन
ह्युंदाई आपली आगामी एसयूव्ही Exter १० जुलै रोजी लॉन्च करणार आहे. नवीन कारमध्ये नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि CNG या दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. या एसयूव्हीमध्ये Hyundai Grand i10 Nios आणि Aura मॉडेल्सवर आधारित सारखेच पॉवरट्रेन आणि ट्रासनमिशांचे पर्यय मिळतील. एसयूव्ही १.२ लिटरच्या ४ सिलेंडर असलेल्या पेट्रोल इंजिनसह लॉन्च होण्याची शक्यता आहे. याबाबतचे Financial Express ने दिले आहे.
हेही वाचा : लॉन्चिंगपूर्वीच स्पॉट झाली टाटाची ‘Punch EV’; किंमत आणि…, एकदा बघाच
हे इंजिन एकूण ८२ बीएचपी पॉवर आणि ११३.८ एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. पेट्रोल इंजिनला ५-स्पीड मॅन्युअल आणि AMT सह दोन ट्रासनमिशन पर्यायांमध्ये लॉन्च केले जाईल. ह्युंदाई ही एसयूव्ही CNG व्हर्जनमध्ये देखील सादर करणार आहे. यामध्ये सीएनजी इंजिन ६८ बीएचपी पॉवर आणि ९५.२ एनएम टॉर्क जनरेट करेल. CNG व्हर्जन केवळ ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येईल.
Exter शी स्पर्धा करणाऱ्या टाटा पंचमध्ये १.२ लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. पंचमध्ये ३ सिलेंडर मोटर असतील. लॉन्च होणाऱ्या Exter प्रमाणेच पंचमधील इंजिन हे ८५ बीएचपी पॉवर आणि ११३ एनएम तर जनरेट करते. Exter प्रमाणेच पंच देखील ५-स्पीड मॅन्युअल आणि AMT या दोन्ही पर्यायांमध्ये येईल. या वर्षाच्या सुरुवातीला सर्वात मोठा शो ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये टाटाने पंचचे CNG व्ह्जर्ण सादर केले होते. मात्र अजूनही पंचचे सीएनजी मॉडेल बाजारात लॉन्च करण्यात आलेले नाही.
इंजिन आणि गिअरबॉक्स
सेफ्टी फीचर्स
Exter एसयूव्हीमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स मिळणार आहेत. Exter बाजारामध्ये EX, S, SX, SX(O) आणि SX(O) Connect या प्रकारांमध्ये उपलध होणार आहे. नवीन एसयूव्हीमध्ये ६ एअरबॅग्स, की-लेस एंट्री , EBD सह ABS, रिअर पार्किंग सेन्सर, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, हिल असिस्ट कंट्रोल आणि अन्य अनेक फीचर्स यामध्ये मिळणार आहेत. तसेच ह्युंदाई Exter आपल्या सेगमेंटमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि Burglar अलार्म सारखे फिचर देणारी पहिली कार असेल.
दुसरीकडे , ग्लोबल NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी टाटा पंच ही त्याच्या विभागातील एकमेव कार आहे. यामध्ये ड्युअल एअरबॅग्स, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, रेन सेन्सिंग वायपर्स, ABS आणि EBD सारखे फीचर्स यामध्ये मिळतात.
फीचर्स
Exter मध्ये ८ इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळणार आहे. ही सीसीट्म १० प्रादेशिकआणि २ आंतरराष्ट्रीय भाषांना सपोर्ट करणार आहे. एसयूव्हीमध्ये ७ नॅचरल Ambient साउंड सिस्टीमचा सपोर्ट असणार आहे. अँड्रॉइड ऑटो आणि Apple कार प्ले, वायरलेस फोन चार्जर, सी-टाईप पोर्ट आणि क्रूझ कंट्रोल हे फिचर मिळतील. तसेच यामध्ये ४.२ इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील पाहायला मिळणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला, टाटा पंचमध्ये ७ इंचाचा फ्लोटिंग टचस्क्रीन मिळणार आहे. यामध्ये फोन कनेक्टेड फीचर्स, नेव्हिगेशन सिस्टीम आणि म्युझिक सिस्टीमची हरमन कंपनीचे ६-स्पिकर्स मिळतात. टाटा पंचमध्ये अॅनालॉग डायल्ससह ४.२ इंचाचा सेमी डिजिटल कन्सोल देण्यात आला आहे.
हेही वाचा : लॉन्चिंगपूर्वीच स्पॉट झाली टाटाची ‘Punch EV’; किंमत आणि…, एकदा बघाच
सनरूफ आणि डॅशकॅम
ह्युंदाई Exterहे इलेक्ट्रिक सनरुफसह येणारे सेगमेंटमधील पहिलेच वाहन असेल. या सनरूफला व्हॉईसचा सपोर्ट असणार आहे. यामध्ये समोरील आणि मागील कॅमेऱ्यांसाठी ड्युअल कॅमेरा व्हिजन, २.३१ इंचाचा LCD डिस्प्ले, स्मार्टफोन APP आधारित कनेक्टिव्हीटी आणि सर्व रेकॉर्डिंग मोड प्रदान करते.