Hyundai Exter Booking Open:  देशातील सुप्रसिद्ध कार निर्माता कंपनी Hyundai India आपली पहिली मायक्रो Hyundai Exter Micro SUV देशांतर्गत बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. Hyundai Motor India ने अधिकृतपणे त्यांच्या नवीन मायक्रो SUV ची रचना आणि लूक उघड केला आहे. कंपनीने त्याचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. सर्व-नवीन Hyundai Exter ही कंपनीची भारतातील सर्वात लहान SUV असेल. Hyundai Exter ही कार लॉंच झाल्यानंतर Tata Panch, Nissan Magnite Plus आणि Citroen C3 शी या कारची टक्कर होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Hyundai Exter Micro SUV मध्ये काय असेल खास?

Hyundai Exter ला १.२-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळेल, जे Grand i10 Nios ला देखील शक्ती देते. हे इंजिन ८२ bhp पॉवर आणि ११३Nm टॉर्क जनरेट करेल. यात ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMT चा पर्याय मिळेल. ह्युंदाई एक्‍स्‍टरमध्‍ये लवकरच सीएनजी प्रकार देखील उपलब्‍ध केले जाऊ शकतात.

(हे ही वाचा : ४ लाखाच्या ‘या’ मारुती कारनं ग्राहकांना लावलं वेड, ३० दिवसातच १४ व्या स्थानावरुन पोहोचली सातव्या स्थानी, मायलेज २४ kmpl )

Hyundai Exter Micro SUV किंमत आणि बुकिंग

Hyundai Exter Micro एसयूव्हीची किंमत ६ लाख रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. ह्युंदाईने लाँचिंग आधीच नवीन एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक ११,००० रुपयांच्या टोकन रकमेसह बुकिंग करू शकतात. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा Hyundai डीलरशिपवरून बुक केले जाऊ शकते.