Hyundai एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. ह्युंदाई कंपनी लवकरच आपली Exter एसयूव्ही लॉन्च करणार आहे. ही एसयूव्ही १० जुलै २०२३ रोजी लॉन्च करणार आहे. ही कंपनीच्या सेगमेंटमधील सर्वात लहान एसयूव्ही कार आहे. यामध्ये कंपनीने अनेक फीचर्स दिले वाईट. कंपनीने या एसयूहीच्या इंटेरिअरचे फोटोज देखील शेअर केले आहेत. Exter एसयूव्ही ही ह्युंदाईची सर्वात परवडणारी एसयूव्ही असणार आहे. याची स्पर्धा टाटा पंचशी होणार आहे. Exter लॉन्च झाल्यावर तिची कामगिरी कशी असणार हे पाहणे महत्वाचे आहे. आज आपण Exter बद्दल पाच महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंटेरिअर आणि फीचर्स

नवीन ह्युंदाई exter चा डॅशबोर्ड ग्रँड i10 Nios आणि Aura च्या डॅशबोर्ड सारखे आहे. यामध्ये अँड्रॉइड ऑटो, Apple कार प्ले आणि ह्युंदाईच्या BlueLink कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसह यामध्ये ८.० इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात येणार आहे. तसेच या एसयूव्हीमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिक सनरूफ, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम ग्राहकांना मिळणार आहे.

हेही वाचा : आतमधून कशी दिसते ह्युंदाईची Exter SUV? ‘इतक्या’ दिवसांनी होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

ह्युंदाई Exter

ह्युंदाई Exter ची किंमत ही ६ लाख ते ९.५० लाख (एक्सशोरूम) रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. तर टाटा पंच या गाडीची किंमत ६ लाख ते ९.५२ लाख (एक्सशोरूम) रुपयांदरम्यान आहे.

कधी होणार लॉन्च

ह्युंदाई कंपनी आपली मायक्रो एसयूव्ही १० जुलै रोजी भारतामध्ये लॉन्च करणार आहे. ह्युंदाईने लाँचिंग आधीच नवीन एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक ११,००० रुपयांच्या टोकन रकमेसह बुकिंग करू शकतात. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा Hyundai डीलरशिपवरून बुक केले जाऊ शकते.

डिझाईन

Hyundai Exter ला पॉवर १.२-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे Grand i10 Nios आणि काही इतर Hyundai कारला देखील शक्ती देते. हे इंजिन ८२ bhp कमाल पॉवर आणि ११३ Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यामध्ये एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर एच शेप हेडलॅम्प, १७-इंचाचे अलॉय व्हील यांसारखे अनेक फीचर्स दिले जाऊ शकतात. त्याचवेळी, डिजिटल एमआयडी, स्टिअरिंगवरील नियंत्रणे आणि सुरक्षिततेसाठी अनेक वैशिष्ट्ये आतील भागात आढळू शकतात.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 17 June: राज्यातील ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

ह्युंदाई Exter Vs टाटा Punch

ह्युंदाई Exter या एसयूव्हीची स्पर्धा टाटा मोटर्सच्या पंचशी होऊ शकते. पंच ही टाटाची सर्वात परवडणारी एसयूव्ही आहे. तसेच कंपनीने तसेच ह्युंदाई कंपनीने आपल्या मायक्रो एसयूव्ही Exter साठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून भारतीय क्रिकेट संघातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एस असणारा हार्दिक पांड्याची निवड केली आहे. क्रिकेटर हार्दिक पांड्या मायक्रो एसयूव्हीच्या एका नवीन जाहिरातीमध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyundai exter luanch 10 july india features price and important things check details tmb 01
Show comments