Hyundai मोटर इंडिया आणि टाटा मोटर्स या दोन लोकप्रिय वाहन उत्पादक कंपन्या आहेत. दोन्ही कम्पन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असतात. नुकतीच ह्युंदाईने आपली Exter ही मायक्रो एसयूव्ही लॉन्च केली आहे. ह्युंदाई Exter ही टाटाच्या Punch ला टक्कर देते, तिच्याशी स्पर्धा करते हे आपल्याला माहिती आहेच. मागील महिन्यात दोघांपैकी कोणाचे प्रदर्शन चांगले राहिले हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Exter Vs Punch : किंमत
ह्युंदाई Exter ची किंमत ही ५,९९,९९९ रूपये ते १०,०९,९९० लाख रूपये इतकी आहे. तर टाटा मोटर्सच्या पंचची किंमत ५,९९,९०० लाख रूपये ते १०,०९,९०० लाख रुपये आहे. या दोन्ही किंमत एक्सशोरुम किंमती आहेत. Hyundai EXTER कंपनीच्या इतर मॉडेल Grand i10 Nios च्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. निओसच्या धर्तीवर कंपनीची ही कार पेट्रोल व्हर्जनसोबतच सीएनजी व्हर्जनमध्येही सादर करण्यात आली आहे. नवीनतम Hyundai EXTER बाजारात उपलब्ध असलेल्या Tata Punch, Maruti Suzuki Fronx सारख्या वाहनांना टक्कर देते.
Exter Vs Punch : इंजिन
Exter मध्ये १.२ लिटरचे Kappa पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे ८३ पीएस आणि ११३.८ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड MT किंवा ५-स्पीड AMT जोडले आहे. यामध्ये एक सीएनजी पर्याय देखील उपलब्ध आहे. जो ६९ पीएस आणि ९५.२ एनएम टॉर्क जनरेट करते. हे सीएनजी इंजिन केवळ ५-स्पीड MT सह जोडलेले आहे.
तर दुसरीकडे टाटा पंचमध्ये कंपनीने १.२ लिटरचे रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन वापरले आहे. जे ८८ पीएस आणि ११५ एनएम टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी ५-स्पीड AMT आणि ५-स्पीड MT चा समावेश आहे. यात सीएनजीचा पर्याय देखील उपलब्ध आहे. हे इंजिन फक्त ५-स्पीड MT ला जोडण्यात आले आहे.
Exter Vs Punch : जुलैमधील सेल्स
ह्युंदाई Exter ने जुलैमध्ये ७,००० युनिट्सची किरकोळ विक्री केली. त्या तुलनेत टाटाच्या पंच ने जुलै महिन्यात exter पेक्षा जास्त म्हणजेच १२,०१९ युनिट्सची विक्री केली आहे.