Hyundai Motor India Limited (HMIL) ने त्यांची आगामी काळामध्ये लॉन्च होणाऱ्या ह्युंदाई EXTER साठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून भारतीय क्रिकेट संघातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असा हार्दिक पांड्या याची निवड केली आहे. क्रिकेटर हार्दिक पंड्या मायक्रो एसयूव्हीच्या एका नवीन जाहिरातीमध्ये दिसणार आहे.

ह्युंदाई मोटर इंडियाचे सीओओ तरुण गर्ग म्हणाले, ”ह्युंदाई Exter ही एक एसयूव्ही आहे. ह्युंदाई Exter साठी आम्ही हार्दिक पांड्याशिवाय इतर कोणाचाही विचार करू शकत नाही. जो क्रिकेटमध्ये सध्याच्या इतिहासामध्ये यशस्वी खेळाडू म्हणून समोर आला आहे. एक खेळाडू म्हणून खेळपट्टीवरील त्याच्या चांगल्या कामगिरीच्या आधारावर आम्हाला खात्री आहे की, हार्दिक पांड्या आमची ही मोहिम पुढे नेईल.”

Heroic Railway Employee Saves Young Woman from Suicide: Viral Video
आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळाकडे धावली तरुणी, कर्मचाऱ्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले, धक्कादायक VIDEO VIRAL
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
IPL 2025 Retention Rules Announced
IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्जसाठी आनंदाची बातमी! ‘या’ नियमामुळे महेंद्रसिंग धोनीला ठेवता येणार कायम
jhansi pitbull king cobra viral video
Video: पिट बुल श्वानाची कमाल; लहान मुलांना वाचविण्यासाठी नागाला आपटून आपटून मारलं, व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?
Heart warming video of father and son after passing exam emotional video
“आयुष्यभराचं बापाचं कर्ज, मुठभर गुलालात फेडलं” बाप-लेकाचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत येईल पाणी
boyfriend tries to convince his upset girlfriend on the road
रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनविण्यासाठी तरुणानं भर रस्त्यात काय केलं पाहा; सगळेच पाहू लागले अन् शेवटी…, VIDEO झाला व्हायरल
Manu Bhaker Special Message to Neeraj Chopra on His Injury in Diamond League
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेरचा नीरज चोप्रासाठी खास संदेश, दुखापतीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हणाली…
aarya slapped nikki tamboli bigg boss marathi 5
आर्याने निक्कीला मारलं ते दृश्य प्रेक्षकांना का दाखवलं नाही? रितेश देशमुख कारण सांगत म्हणाला, “घरात…”

हेही वाचा : Car Price Hike: 1 जुलैपासून ‘या’ हॅचबॅक कारच्या किंमतीमध्ये होणार १७,५०० रुपयांची वाढ, खरेदी करण्यापूर्वी एकदा बघाच

ह्युंदाई Exter चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड झाल्यावर हार्दिक पांड्या म्हणाला, ”मी खूपच उत्साहित आहे. मला गाड्यांची फार आवड आहे आणि एसयूव्ही माझ्या स्टाईलमध्ये एकदम परफेक्ट बसते. ही एसयूव्ही आतून मोठी आणि आश्चर्यजनक आहे. बाहेरून डायनॅमिक असण्याबरोबरच तुम्हाला हव्या असणाऱ्या फीचर्ससह ती येते. त्याच्या बोल्ड स्टेन्सपासून ते रोमांचकारी ड्रायव्हिंग पर्यंत ही खरेच गेम चेंजर आहे. ही एसयूव्ही भारतातील लोकांना नक्की आवडेल असा मला विश्वास आहे. ”

Hyundai Exter चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Hyundai Exter ला १.२-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळेल, जे Grand i10 Nios ला देखील शक्ती देते. हे इंजिन ८२ bhp पॉवर आणि ११३Nm टॉर्क जनरेट करेल. यात ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMT चा पर्याय मिळेल. ह्युंदाई एक्‍स्‍टरमध्‍ये लवकरच सीएनजी प्रकार देखील उपलब्‍ध केले जाऊ शकतात.

Hyundai Exter Micro एसयूव्हीची किंमत ६ लाख रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. ह्युंदाईने लाँचिंग आधीच नवीन एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक ११,००० रुपयांच्या टोकन रकमेसह बुकिंग करू शकतात. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा Hyundai डीलरशिपवरून बुक केले जाऊ शकते.