Hyundai एक वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असतेच. आता लवकरच ह्युंदाई कंपनी आपली मायक्रो SUV Exter भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Hyundai Exter थेट टाटा पंचला टक्कर देईल. २ लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्पा गाठणारी ती सर्वात वेगवान एसयूव्ही बनली आहे. यावरूनच टाटा पंचच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाटा पंचची जमेची बाजू म्हणजे सध्या या एसयूव्हीला कोणीही थेट प्रतिस्पर्धी नाही आहे. मात्र ह्युंदाईच्या Exter च्या येण्याने काही बदल होतील. Hyundai कडून Exter बद्दलचे सर्व डिटेल्स सार्वजनिक करणे बाकी आहे. जे कागदावर इंजिनचे फीचर्स देण्यात आले आहेत त्यावरून ह्युंदाईची ही मायक्रो एसयूव्ही टाटा पंचशी कशी तुलना करते हे जाणून घेऊयात. याबाबद्दलचे वृत्त हे इंडिया टुडेने दिले आहे.

हेही वाचा : Volkswagen ने लॉन्च केली ‘ही’ एसयूव्ही, एअरबॅग्स आणि पार्क असिस्ट फीचर्ससह मिळणार…, जाणून घ्या सविस्तर

ह्युंदाई कंपनी Exter मध्ये १.२ लिटरचे Kappa पेट्रोल इंजिनचा वापर करेल. जे ८३ PS ची पॉवर आणि ११३.८ जनरेट करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ५-स्पीड एमटी आणि ५- स्पीड एमएमटीचा समावेश असणार आहे.

टाटा पंच एसयूव्हीमध्ये १.२ लिटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन येते. जे ८७. ८ PS ची पॉवर आणि ११५ एनएम इतके पीक टॉर्क जनरेट करते. यामध्ये ५-स्पीड एमटी आणि ५-स्पीड AMT असे दोन्ही पर्याय मिळतात.

Hyundai Exter ला CNG चा पर्याय सध्या उपलब्ध आहे. टाटा पंचला तो लवकरच उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 19 May: पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की घटले? वाचा तुमच्या शहरातील दर

किंमत

Tata Punch या एसयूव्हीची किंमत ६ लाख ते ९.५२ लाखांच्या (एक्सशोरूम) मध्ये आहे. तर ह्युंदाई Exter ची किंमत ६ ते ९.५० लाख (एक्सशोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे.

ह्युंदाई Exter चे बुकिंग सुरु झाले असून ही मायक्रो एसयूव्ही पुढील महिन्यात भारतात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.