सध्या देशामध्ये अनेक वाहन उत्पादक कंपन्या आहेत. ज्यांनी आपल्या नवनवीन फीचर्स असलेल्या SUV भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केल्या आहेत. त्यामुळे देशामध्ये एसयूव्हीचे/crossover चे मार्केट आणि खरेदी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. नुकतीच मारूती सुझुकीने Fronx एसयूव्ही लॉन्च केली आहे. त्यापाठोपाठ ह्युंदाई आपली नवीन मायक्रो एसयूव्ही Exter बाजारामध्ये लॉन्च करण्याची तयारी करत आहे.
अशा स्थितीमध्ये वाहन खरेदी करताना खरेदीदारांच्या मनात नेहमीच कोणती गाडी खरेदी करण्याची हा प्रश्न पडतो. तर आज आपण ह्युंदाई Exter आणि मारूती सुझुकी Fronx चे फीचर्स, डिझाईन,इंजिन आणि सेफ्टी फीचर्स व किंमत यांच्यातील तुलना जाणून घेणार आहोत. या कदाचित नवीन गाडी खरेदी करताना हे डिटेल्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. हे वृत्त Financial Express ने दिले आहे.
हेही वाचा : आतमधून कशी दिसते ह्युंदाईची Exter SUV? ‘इतक्या’ दिवसांनी होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स
डिझाईन
दोन्ही कंपन्यांच्या गाड्या भारतीय बाजारपेठेमध्ये पहिल्यापासूनच उपलब्ध असणाऱ्या जुन्या मॉडेलवर आधारित आहेत. ह्युंदाईची Exter ही Grand i10 Nios वर आधारित आहे. तर मारूती सुझुकीची Fronx एसयूव्ही बलेनो वर आधारित आहे. दोन्हीही गाड्यांमध्ये मोनोकोक चेसिस (monocoque chassis) फीचर बघायला मिळते. मायक्रो एसयूव्ही ह्युंदाई Exter मध्ये देण्यात आलेल्या फीचरबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये व्हर्टिकल स्टायलिंगसह एसयूव्ही लुक पाहायला मिळतो. तथापि Fronx मारूती बलेनोसारखी दिसते. दोन्ही गाड्यांमध्ये लोअर बॉडी क्लॅडिंग आणि व्हील आर्च मिळते. मारूती fronx ची स्टाईल चांगल्या प्रकारे मॅनेज करण्यात आले आहे.
इंजिन आणि गिअरबॉक्स
ह्युंदाई ग्रँड i10 Nios वर आधारित exter मध्ये १.२ लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ८२ बीएचपी आणि ११३ एनएम टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी नवीन एक्सटरमध्ये इंजिनला ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह किंवा AMT जोडण्यात येईल. ही एसयूव्ही CNG व्हर्जनमध्ये देखील उपलब्ध असणार आहे.
दुसऱ्या बाजूला Fronx दोन इंजिनच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये नॅचरली एस्पिरेटेड १.२ लिटरचे इंजिन आणि टर्बोचार्ज असे १.० लिटरचे इंजिन मिळते. ट्रान्समिशनसाठी इंजिनला मॅन्युअल AMT किंवा टॉर्क कन्व्हर्टर अशा तीन गिअरबॉक्ससह जोडण्यात आले आहे.
हेही वाचा : Honda ने आपली ‘ही’ प्रीमियम बाईक नवीन अपडेटसह केली लॉन्च, फीचर्स आणि किंमत एकदा पहाच
फिचरबद्दल बोलायचे झाल्यास ह्युंदाईच्या Exter मध्ये पण अनेक फीचर्स देण्यात येणार आहेत. यामध्ये Nios मॉडेलमध्ये असलेल्या स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी आणि कनेक्टड कार टेकसह ८.० इन्फोटेनमेंट सिस्टम अशी फीचर मिळतात. तसेच व्हॉइस अॅक्टिव्हिटेड सनरूफ, ड्युअल कॅश कॅम, रिव्हर्स कॅमेरा आणि क्रूज कंट्रोल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह ABS, EBD, ESC, VSM आणि ६ एअरबॅग्स आणि अनेक फिचर देण्यात आले आहे.
तर मारूती सुझुकी Fronx मध्ये ड्युअल टोन इंटेरिअर, हेड अप डिस्प्ले युनिट , एक ३६० डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, स्मार्टफोन कनेक्टिव्हीटीसह ९ इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅडल शिफ्टर्स, कनेक्टेड कार टेक, 6 एअरबॅग्स, EBD सह ABS, ISOFIX सीट अँकर, रिव्हर्स कॅमेरा यासह सर्व फीचर देण्यात आली आहेत. दोन्ही गाड्यांमध्ये जवळजवळ समानच फीचर्स असलेली पहिला मिळतात.
Exter की Fronx : कोणती खरेदी करावी ?
Exter आणि Fronx मध्ये समान फीचर्स आणीन सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत. अशा स्थितीमध्ये या गाड्यांची किंमत खरेदीदारांसाठी महत्वाची ठरू शकते. ह्युंदाई Exter १० जुलै रोजी भारतात लॉन्च होणार आहे. त्याची एक्सशोरूम किंमत ६ लाख रुपये असण्याची शक्यता आहे. तर मारूती सुझुकीची किंमत ७.४६ लाख रुपयांपासून सुरू होते.