Hyundai Cheapest Car Financial Plan: हॅचबॅक कारचा सेगमेंट भारतात वेगाने उदयास येत आहे. सेगमेंटमध्ये कमी किमतीच्या मायलेज असलेल्या कार तसेच प्रीमियम डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह कार आहेत. अशीच एक कार Hyundai Grand i10 Nios ही आहे. अलीकडेच कंपनीने ते एका नवीन फॉर्ममध्ये सादर केली आहे, ज्यामध्ये अनेक अपडेट समाविष्ट आहेत. तुम्हालाही Hyundai Grand i10 Nios आवडत असेल किंवा खरेदी करायची असेल, तर या कारबद्दल संपूर्ण माहितीसह आम्ही तुमच्यासाठी फायनान्स प्लॅन घेऊन आलो आहोत. तुम्ही ही कार फक्त ८०,००० रुपयांमध्ये घरी कशी आणू शकता, जाणून घ्या…
Grand i10 Nios किंमत
Hyundai Grand i10 Nios ही कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे. त्याची किंमत ५.७३ लाख रुपयांपासून सुरू होते. जरी ही किंमत बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत आहे. तुम्ही ते दिल्लीत विकत घेतल्यास, ते ऑन-रोड ६,९८,०४८ पर्यंत जाते.
(हे ही वाचा : ५.५ लाखाच्या ५ सीटर कारसमोर बाजारात सर्व पडल्या फेल? खरेदीसाठी लाखो ग्राहकांच्या रांगा, मायलेज ३३ किमी )
फायनान्स प्लॅन जाणून घ्या
जर तुम्हाला ही कार घ्यायची असेल पण त्यासाठी एवढी मोठी रक्कम खर्च करता येत नसेल, तर तुम्ही येथे नमूद केलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे ८० हजार भरून ही कार घरी घेऊन जाऊ शकता. ऑनलाइन फायनान्स प्लॅनचे तपशील देणाऱ्या डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर तुमचे बजेट ८०,००० रुपये असेल, तर बँक या आधारावर ६,१८,०४८ रुपयांचे कर्ज देऊ शकते, ज्यावर ९.८ टक्के वार्षिक व्याजदर असेल