Budget Car: भारतात स्पोर्ट्स कारसाठी एक वेगळीच क्रेज आहे. नामांकित कार कंपन्यांनी मध्यमवर्गाला परवडेल अशा दरात ऑटोगिअर, स्पोर्टी लूकच्या विविधढंगी कार बाजारात या वर्षात आणल्या आहेत. देशातील आघाडीच्या कार कंपन्यांनी यंदा किफायतशीर दरात ऑटोगिअरच्या कार ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. कार बाजारातील हा नवा ट्रेंड ग्राहकांच्या पसंतीला उतरला आहे. यंदा सर्वाधिक पसंती ऑटोगिअर सुविधेसह आकर्षक स्पोर्टी डिझाइनच्या कारला आहे. बाजारात १० लाखांपेक्षा कमी किमतीत जबरदस्त फीचर्स आणि स्पोर्टी लूक असणाऱ्या कार उपलब्ध आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या तुम्हाला परवडणाऱ्या कार.
१० लाखांपेक्षा कमी किमतीतील ‘या’ आहेत स्पोर्टी लूक कार
Hyundai Grand i10 Nios Turbo
Grand i10 Nios Turbo मध्ये १.०-लिटर तीन-सिलेंडर T-GDi टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. जे १०० PS पॉवर आणि १७२ Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. तसेच यात अनेक जबरदस्त फीचर्स देखील उपलब्ध आहेत. ही एक अतिशय आलिशान स्पोर्ट्स कार आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत ८.०२ लाख रुपयांपासून सुरू होते.
(हे ही वाचा : 7-सीटर SUV-MPV शोधताय? पुढील वर्षांत लाँच होणार ‘या’ पाच दमदार कार, लूक अन् डिझाईनही कमाल )
Tata Altroz iTurbo
नवीन व्हेरियंट्मध्ये नेक्सॉन फेसलिफ्ट वरून घेण्यात आले आहे. १.२ लीटरचे ३ सिलिंडरचे टर्बोचार्ज्ड इंजिन दिले आहे. आय टर्बो एक नवीन व्हेरियंट आहे. यात इंजिन शिवाय कोणताही मोठा बदल करण्यात आला नाही.Tata Altroz iTurbo पेट्रोल भारतात लाँच करण्यात आली आहे. कंपनीने भारतीय बाजारात या कारची एक्स-शोरूम किंमत ८.२५ लाख रुपये इतकी आहे.
Hyundai i20 N Line
या कारला भारतात Hyundai i20 N Line कारला लाँच केले आहे. ही कारला स्पोर्टी लूक सोबत अनेक खास फीचर्स दिले आहेत. Hyundai i20 N Line चे इंजिन आणि पॉवर मध्ये रेग्युलर मॉडल प्रमाणे १.० लीटरचे ३ सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले आहे. जे १२०bhp पर्यंत पॉवर आणि १७२Nm टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे. यात १६ इंचाचा अलॉय व्हील्ज सोबत रेड फ्रंट ब्रेक कॅलिपर्स दिले आहेत. किंमत १० लाख रुपयांपासून सुरू होते.