दिवाळीनिमित्त विविध कंपन्या विविध ऑफर्स देऊन गाड्यांची विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशातच कोरियन कार निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर्स आपल्या मोटारींवर भारी सवलत आणि ऑफर घेऊन आली आहे. ह्युंदाई कार घेण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. ह्युंदाई आपल्या गाड्यांवर १ लाखांपर्यंतची सूट देत आहे, ही ऑफर केवळ ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वैध आहेत. ही सवलत देशभरातील अधिकृत ह्युंदाई डीलरशिपवर उपलब्ध असेल. जाणून घेऊया ह्युंदाईच्या कोणत्या गाड्यांवर मिळणार ही भरघोष सूट…
ह्युंदाई ऑरा
ह्युंदाई ऑरा हॅचबॅकच्या दोन्हीं प्रकारात ३३,००० पर्यंत सूट देत आहे. या सवलती १०,००० पर्यंत रोख आणि एक्सचेंज बोनसच्या स्वरूपात उपलब्ध असतील. ही ऑफर सरकारी आणि कॉर्पोरेट कर्मचार्यांसाठी ३,००० रुपयांच्या सवलतीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ह्युंदाई Grand i10 Nios
सरकारी आणि कॉर्पोरेट कर्मचार्यांसाठी रोख ऑफर (३५,००० पर्यंत), एक्सचेंज डिस्काउंट (रु. १०,००० पर्यंत) आणि फायदे (रु. ३,००० पर्यंत) या स्वरूपात सूट मिळू शकते. म्हणजेच, एकूणच Grand i10 Neos वर ४८ हजार रुपयांची सूट मिळू शकते.
आणखी वाचा : Maruti Eeco खरेदीचा विचार करताय; मग जाणून घ्या फायनान्स प्लॅन
ह्युंदाई i20
Hyundai i20 ऑक्टोबर महिन्यात २०,००० पर्यंत डिस्काउंटसह उपलब्ध आहे. यामध्ये १०,००० रुपयांची रोख सूट आणि १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. ही सवलत हॅचबॅकच्या पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकारांवर लागू आहे.
ह्युंदाई कोना
ह्युंदाई कोना इलेक्ट्रिकवर ऑक्टोबर महिन्यात कमाल १ लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या सवलतीमध्ये फक्त रोख ऑफर समाविष्ट आहेत. वाहनावर कोणताही एक्सचेंज बोनस किंवा कॉर्पोरेट लाभ नाही. ह्युंदाई कोना ची सुरुवातीची किंमत २३.८४ लाख रुपये आहे.