Best Selling SUV Car in India: भारतात गेल्या काही वर्षांपासून एसयूव्ही कार्सची मागणी वाढली आहे. ग्राहकांची ही मागणी पाहता अनेक कंपन्यांनी सात लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत SUV लाँच केल्या आहेत. भारतात सर्वाधिक विकली जाणारी कार देखील ‘टाटा पंच’ नावाची परवडणारी मायक्रो एसयूव्ही आहे. तथापि, आणखी एका नवीन एसयूव्हीला या सेगमेंटमध्ये खूप पसंत केलं जात आहे. या कारचे फीचर्स, किंमत, डिझाईन लुक यामुळे देशातील बाजारपेठेत ह्युंदाईच्या एका कारचा बोलबाला पाहायला मिळतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Hyundai Motors ने गेल्या वर्षी भारतात लाँच केलेल्या micro-SUV ला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या कारच्या विक्रीचे आकडे आता कंपनीने उघड केले आहे. ही SUV गेल्या वर्षी जुलैमध्ये लाँच करण्यात आली होती आणि या कारला बाजारात दाखल होऊन आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या कालावधीत कंपनीने ९३,००० ह्युंदाईच्या या micro-SUV कारची विक्री केलं असल्याचे नमूद केलं आहे.

(हे ही वाचा : बाकी कंपन्यांची उडाली झोप, आता Royal Enfield आणतेय इलेक्ट्रिक बुलेट, पाहा कधी होणार दाखल?)

आम्ही तुम्हाला ज्या कारबद्दल सांगत आहोत, ती कार Hyundai Exter आहे. ऑटो मार्केटमध्ये Hyundai च्या Hyundai Exter एसयूव्हीला मोठी मागणी असून Hyundai च्या लाइनअपमध्ये Exter खूप लोकप्रिय झाले आहे. आता Exter ला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने Exter Night Edition लाँच केलं आहे.

Hyundai Exter या कारमध्ये काय आहे खास?

Hyundai Exter मध्ये ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह ४.२-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले आहे. कारच्या मानक वैशिष्ट्यांमध्ये ड्युअल डॅशकॅम, ६ एअरबॅग्ज, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, टीपीएमएस, थ्री पॉइंट सीटबेल्ट यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे जे सर्व प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. ही कार ६० हून अधिक कनेक्ट केलेल्या कार वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. प्रत्येक व्हेरिएंटमध्ये ६ एअरबॅग्ज मिळवणारी ही कंपनीची पहिली सब-कॉम्पॅक्ट SUV आहे.

Hyundai Exter मध्ये १.२ लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ८१ bhp ची कमाल पॉवर आणि ११४ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने याला CNG व्हर्जनमध्येही सादर केले आहे. सीएनजीमध्ये हे इंजिन ६८ बीएचपी पॉवर आणि ९५ एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये या कारचे मायलेज १९.४ किमी प्रति लिटर आहे, तर सीएनजीमध्ये ही एसयूव्ही २७.१ किमी प्रति किलो मायलेज देऊ शकते.

किंमत किती?

Hyundai Exter ही कार EX, EX(O), S, S(O), SX, SX(O) आणि SX(O) या सात प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. कंपनी या SUV वर तीन वर्षांची अमर्यादित किलोमीटर वॉरंटी देत ​​आहे. सात वर्षांच्या विस्तारित वॉरंटीचा पर्याय देखील आहे. ही मायक्रो एसयूव्ही ६ मोनोटोन आणि ३ ड्युअल टोन एक्सटीरियर पेंट्समध्ये उपलब्ध आहे. Hyundai Exeter च्या किंमत ६ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून १० लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत सुरू होतात.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyundai india registers 93000 units sales of the exter suv since its launch in july 2023 pdb
Show comments