Electric Car: Hyundai Motor India ने Auto Expo 2023 मध्ये Ioniq 5 EV ला लाँच केले होते. तेव्हा पासूनच या कारला मोठी मागणी दिसत आहे. याची बुकिंग डिसेंबर २०२२ मध्ये ओपन करण्यात आली होती. सध्या बाजारात ही कार खरेदीसाठी तुफान गर्दी होताना दिसत आहे. आतापर्यंत या इलेक्ट्रिक कारची ६५० हून जास्त बुकिंग झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Hyundai IONIQ5 ची वैशिष्ट्ये

कार २०-इंच एरो-ऑप्टिमाइज्ड चाकांसह येते. हे ग्रॅव्हिटी गोल्ड मॅट, ऑप्टिक व्हाइट आणि मिडनाईट ब्लॅक पर्ल या तीन पेंट शेडमध्ये उपलब्ध असेल. कारच्या आत दोन १२.३-इंच स्क्रीन आढळतील, यातील एक युनिट ड्रायव्हर डिस्प्ले असेल आणि दुसरा इन्फोटेनमेंट सिस्टम डिस्प्ले असेल. यामध्ये हवेशीर फ्रंट सीट्स, ADAS लेव्हल २, पॉवर सीट्स, सहा एअरबॅग्ज आणि वाहन-टू-लोड फंक्शन (V2L) सारखी वैशिष्ट्ये असतील. ही कार फक्त ७.६ सेकंदात ०-१०० किमी/ताशी वेग मिळवू शकते.

ही कार Volvo XC40 रिचार्जशी स्पर्धा करेल. ही कार ७८ kWh बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे. जे ४०२bhp चे जास्तीत जास्त पॉवर आउटपुट आणि ६६०Nm टॉर्क जनरेट करते. एका चार्जवर याला ४१८ किलोमीटरची रेंज मिळते. या कारमध्ये ७२.६ kW लिथियम आयन बॅटरी वापरण्यात आली आहे, जी केवळ ५ मिनिटांच्या चार्जमध्ये १०० किलोमीटरची रेंज देऊ शकते.

(हे ही वाचा: लुक-फीचर्समध्ये मोठे बदल होत लाँचिंगआधीच ‘Honda City Facelift’ कारची बुकिंग सुरु, पाहा टोकन अमाउंट किती?)

‘अशी’ करा बुकिंग

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जावून किंवा जवळच्या ह्युंदाई डीलरशीपकडे जावून या कारला बुक करता येवू शकते. या इलेक्ट्रिक कारच्या बुकिंगसाठी कंपनीने १ लाख रुपयाचे टोकन अमाउंट रक्कम ठेवली आहे. याची डिलिव्हरी मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू केली जाणार आहे.

Ioniq 5 EV किमतीत वाढ

कंपनीने लाँचिंग वेळी या कारची एक्स शोरूम किंमत ४४.९५ लाख रुपये ठेवली होती. Hyundai कडून Ioniq 5 EV इलेक्ट्रिक कारच्या किंमतीत नुकतीच वाढ करण्यात आली आहे. कंपनीने या कारच्या किंमतीत एक दोन हजार नव्हे तर तब्बल १ लाख रुपयांची वाढ केली आहे. या कारची डिलिव्हरी मार्च २०२३ पासून सुरू केली जाणार असल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyundai ioniq 5 ev has bagged over 650 bookings and its deliveries will begin in march 2023 this electric suv is priced at rs 44 lakh exshowroom pdb