किआ मोटर्स सोबत महिंद्रा आणि टाटा सारख्या कंपन्या आपली नवीन इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत आहेत. आता याच दरम्यान एक चांगली बातमी येत आहे ती म्हणजे दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी Hyundai Motor आगामी इलेक्ट्रिक क्रॉसओवर ‘Hyundai Ioniq 5’ भारतात लाँच करणार आहे. २० डिसेंबर २०२३ रोजी ही कार भारतात पदार्पण करेल. या दिवसापासून या इलेक्ट्रिक कारचे बुकिंगही सुरू होईल. तसेच तिच्या किंमतीही पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी २०२३ मध्ये जाहीर केल्या जातील.
आगामी IONIQ 5 ही Hyundai Kona नंतर भारतात दाखल होणारी कंपनीची दुसरी इलेक्ट्रीक कार असेल. Kia EV6 चं फीचर्स आणि पॉवरट्रेन नवीन इलेक्ट्रिक SUV मध्ये वापरले जाऊ शकतात. सिंगल चार्जवर, IONIQ 5 इलेक्ट्रिक SUV ३००-३५० किमी अंतर कापेल. नवीन इलेक्ट्रिक SUV ची संभाव्य वैशिष्ट्ये आणि वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया.
(हे ही वाचा : 13 Seater Car: Tata, Mahindra नाही तर ‘ही’ कंपनी घेऊन आली 13 Seater Car; शानदार फीचर्सवाल्या कारची किंमतही कमी )
Hyundai Ioniq 5 कशी असेल खास?
Hyundai Ioniq 5 या कारमध्ये जास्तीत जास्त ४८० किलोमीटर पर्यंत ड्रायव्हिंग रेंज मिळेल जी Kona EV पेक्षा २० टक्क्यांनी अधिक आहे. यापूर्वी Kona EV ही ह्युंदायची सर्वात जास्त रेंज देणारी कार होती. Ioniq 5 या कारमध्ये तुम्हाला दोन बॅटरी पॅक मिळतील. ज्यामध्ये ५८kWh किंवा ७२.६kWh चा समावेश आहे. कंपनीने म्हटलंय की, काही ठराविक ठिकाणी या वर्षीच्या पहिल्या सहामाहीमध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Ioniq 5 च्या केबिनमध्ये डॅशबोर्ड, स्विच, स्टीयरिंग व्हील आणि डोर पॅनल पॉलीयूरीथेन बायो पेंटने पेंट केलं आहे. ही कार लांब व्हीलबेस आणि फ्लॅट फ्लोरला सपोर्ट करते. या कारच्या पुढच्या सीट्ससाठी आणि डॅशच्या ओव्हरहेड शॉटमध्ये दोन स्क्रीन्स, इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि इन्फोटेन्मेंट सिस्टिम दिली आहे. यासोबतच Ioniq 5 च्या टू-स्पोक स्टीयरिंग व्हीलच्या उजव्या बाजूला एक फिजिकल ड्राइव्ह स्टॉल्क दिला आहे.
(हे ही वाचा : Car Finance Plan: कार घेण्याचा विचार करताय? ‘ही’ दमदार मायलेजवाली कार आणा फक्त ७५ हजारात घरी; एवढा बसेल EMI )
यामध्ये १२.३-इंचाचा HD टचस्क्रीन डिस्प्ले, १२.३-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जिंग, हेड-अप डिस्प्ले आणि सनरूफ यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील. ही भारतातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक असेल. त्याच्या २०२१ मॉडेलने युरो NCAP क्रॅश चाचणीमध्ये ५ स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त केले.
किंमत
Hyundai Ioniq 5 ची भारतात किंमत ६० लाख रुपयांपर्यंत असू शकते. ही किंमत एक्स-शोरूमनुसार असेल.