देशात अनेक लोकं कोणतीही कार घेताना त्याचा लूक पाहतात. पण आता कारच्या लूकबरोबरच तितकेच त्या कारचे सेफ्टी फीचर्सही पाहायला हवे. कारण कार चालवत असताना अपघात झाल्यास चांगले सेफ्टी फीचर्स कारमध्ये असल्यास तुमचा जीव वाचू शकतो. म्हणून कारचे सेफ्टी फीचर्स पाहणे खूप महत्वाचे असते. मग सर्वात सुरक्षित कार म्हटलं तर सर्वात आधी Tata Nexon कारचा नाव समोर येतो. कारचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केल्यानंतर कंपनीने त्यात बरीच सुधारणा केली. जर आपण सुरक्षा वैशिष्ट्ये याबद्दल बोललो तर, या SUV च्या तुलनेत इतर कोणतेही वाहन मागे पडतात. पण आता या महिन्यात नेक्सॉनला टक्कर द्यायला एक कार बाजारपेठेत दाखल होणार आहे.
आत्तापर्यंत हे वाहन त्याच्या लुक आणि तंत्रज्ञानासाठी ओळखले जात होते पण आता त्याचे फेसलिफ्ट मॉडेल त्याच्या सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये आणि बिल्ट गुणवत्तेत खूप पुढे असेल. ही कार बनवणारी कंपनी देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता अशा परिस्थितीत, नेक्सॉनचे एसयूव्ही सेगमेंटमधील वर्चस्व संपुष्टात येत असल्याचे चित्र दिसते आहे.
आज आम्ही Hyundai Creta Facelift मॉडेलबद्दल बोलत आहोत. कंपनी या महिन्याच्या १६ तारखेला Creta चे फेसलिफ्ट लाँच करू शकते. कारचे बुकिंग ऑनलाइन आणि डीलरशिपवर सुरू झाले आहे. २५ हजार रुपये किमतीत तुम्ही ही कार बुक करू शकता. Creta बद्दल महत्त्वाची माहिती अशी आहे की, आता तुम्हाला यात फक्त चांगले तंत्रज्ञान मिळणार नाही तर उत्तम बिल्ट क्वालिटी सोबतच तुम्हाला मोठ्या प्रमाणात सेफ्टी फीचर्स देखील मिळतील. नवीन क्रेटामध्ये काय खास असेल ते जाणून घेऊया…
(हे ही वाचा : देशात दाखल झालेल्या ‘या’ नव्या बाईकसमोर बुलेटही विसरुन जाल; पण, किंमत पाहून तुम्हालाही फुटेल घाम )
सुरक्षा वैशिष्ट्ये
Creta मध्ये, कंपनीने ६ एअरबॅग्ज, ABS, EBD, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, सीटबेल्ट यासारख्या मानक सुरक्षा वैशिष्ट्यांसह ७० हून सुरक्षा वैशिष्ट्ये प्रदान केली आहेत. ज्यामुळे ही कार सुपर सुरक्षित आहे. यासोबतच कंपनीने कारमध्ये लेव्हल २ ADAS देखील दिली आहेत.
७ प्रकार आणि ३ इंजिन पर्याय
Creta च्या नवीन मॉडेलमध्ये तुम्हाला सात व्हेरियंट ऑफर केले जातील. यामध्ये E, EX, S, S(O), SX, SX Tech आणि SX(O) यांचा समावेश आहे. ही कार आता तुम्हाला नवीन १.५ लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह देखील उपलब्ध होईल. यासोबतच कारमध्ये १.५ लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि १.५ लीटर टर्बो डिझेल इंजिन देखील मिळेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की नवीन १.५ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन तेच आहे जे कंपनी Verna च्या नवीन मॉडेलमध्ये देखील देते. हे इंजिन १६० BHP पॉवर जनरेट करते. नवीन कारमध्ये तुम्हाला ६ स्पीड मॅन्युअल, IVT, ७ स्पीड DCT आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल.