Hyundai Motor India एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. Hyundai Motor India (HMI) ची सर्व-नवीन SUV लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. Hyundai ने या नवीन आगामी उत्पादनाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही Grand i10 Nios सारखीच असण्याची शक्यता आहे. कंपनीची नवीन मायक्रो एसयूव्ही, कोडनेम Ai3, Hyundai च्या उत्पादन लाइन-अपमधील Venue मॉडेलच्या खालचे मॉडेल असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Hyundai Ai3 sub-compact SUV चे डिझाईन आणि फीचर्स

कंपनीची आगामी Ai3 SUV Hyundai च्या K1 प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. Hyundai ची Grand i10 Nios देखील याच मॉडेलवर आधारित आहे. यावर्षी भारतीय बाजारपेठेत येणार्‍या नवीन ह्युंदाई कारचे डिझाइन Casper micro SUV सारखे असू शकते. कॅस्पर मायक्रो एसयूव्ही हे परदेशामध्ये विकले जाणारे वाहन आहे. डिझाइनच्या बाबतीत त्याच्या प्रमाणेच, भारतीय बाजारपेठेत येणारी Hyundai ची नवीन Ai3 सब-कॉम्पॅक्ट SUV स्वतःची खास ओळख असणार आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, इतर ह्युंदाई कारप्रमाणेच या नवीन कारमध्येही गिल्स दिसू शकतात.

हेही वाचा : Kia India च्या ‘या’ कारच्या बुकिंगला १५ एप्रिलपासून सुरुवात, सिंगल चार्जमध्ये मिळणार ७०८ किमीची रेंज

इंजिन आणि गिअरबॉक्स

Hyundai च्या आगामी Ai3 सब-कॉम्पॅक्ट SUV मध्ये १.२ लिटरचे नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन ८२ बीएचपी पॉवर आणि ११३ एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे. तसेच ट्रान्स्मिशनसाठी यामध्ये ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि MMT सिलेक्ट करण्याचा पर्याय असणार आहे. तसेच या नवीन लॉन्च होणाऱ्या गाडीमध्ये कंपनी १.० इंजिन देखील देऊ शकते.

काय असणार किंमत ?

सध्याच्या काळामध्ये Venue ही ह्युंदाईची सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे. Venue ची एक्स-शोरूम किंमत ७.७२ लाखांपासून १३. १८ लाख रुपये इतकी आहे. आगामी Hyundai Ai3 सब-कॉम्पॅक्ट SUV कंपनीच्या उत्पादन लाइन-अपमध्ये Venue मॉडेलपेक्षा खाली ठेवण्यात येणार आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत ६ लाख ते १० लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. Hyundai ची आगामी Ai3 सब-कॉम्पॅक्ट SUV टाटा पंच, निसान मॅग्नाइटसह बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक वाहनांशी स्पर्धा करेल.

Hyundai ने भारतात आपल्या आगामी Ai3 सब-कॉम्पॅक्ट SUV ची टेस्टिंग सुरू केली आहे. या SUV चे उत्पादन चेन्नई येथे स्थित Hyundai प्लांटमध्ये या वर्षी जुलैच्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात ही एसयूव्ही लॉन्च होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyundai launch ai 3 sub compact suv july to august month with attractive features tmb 01
Show comments