Hyundai ही एक लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपले venue हे मॉडेल लॉन्च केले होते. आता कंपनीने या मॉडेलचे नाइट एडिशन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहे. क्रेटा आणि अल्काझार नंतर नाइट एडिशनमध्ये लॉन्च होणारे हे तिसरे मॉडेल आहे. व्हेन्यू नाइट एडिशन भारतीय बाजारपेठेत S(O), SX आणि SX(O) या तीन ट्रिममध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एक्सटेरिअर (एक्सटीरियर)

ह्युंदाई व्हेन्यू च्या नाइट एडिशनमध्ये फ्रंट ग्रील , ORVMs, शार्क-फिन अँटेना, स्किड प्लेट आणि अलॉय व्हील हे सर्व काळया रंगात देण्यात आले आहे. Abyss Black, Atlas White, Titan Grey, Fiery Red आणि ड्युअल टन कलर रंगामध्ये हे मॉडेल ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. नवीन कलर पर्यायांशिवाय, ह्युंदाई व्हेन्यू नाइट एडिशनमध्ये अनेक सुधारणा बघायला मिळतात. ज्यात फ्रंट आणि रिअर बंपर, फ्रंट व्हील आणि रूफरेलवर पितळी रंगाचे इन्सर्टचा समावेश आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Tire killer is going to be tested in three important areas of Thane railway station area
स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
uran panje flamingos
Uran Flamingos : उरणच्या पाणजे पाणथळीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन
MHADA mega list draw scam No inquiry report on draw even after year
म्हाडा बृहतसूची सोडत गैरप्रकार : एक वर्षानंतरही सोडतीचा चौकशी अहवाल गुलदस्त्यात
Mumbai construction debris Reprocessing Project in Dahisar
दहिसरमध्ये राडारोडा पुनर्प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित, आतापर्यंत १६ हजार मेट्रिक टन राडारोड्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया

हेही वाचा : EV सेगमेंटमध्ये Audi चा ‘जलवा’; लॉन्च झाली ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक कार, केवळ ३१ मिनिटांमध्ये होणार चार्ज

इंटेरिअर

व्हेन्यू नाईट एडिशनचे केबिनचे आतील भाग त्याच्या बाहेरील भागासारखे दिसते, ज्यामध्ये काळ्या रंगाच्या केबिनसह काळ्या सीट अपहोल्स्ट्रीसह पितळ रंगाच्या इन्सर्टचा समावेश आहे. याशिवाय यात स्पोर्टी मेटल पेडल्स आणि 3D डिझायनरचाही समावेश आहे. ड्युअल कॅमेरे आणि ऑटोमॅटिक IRVM सह डॅशकॅम टॉप व्हेरियंटमध्ये देण्यात आला आहे आणि याशिवाय बाकीची वैशिष्ट्ये व्हेन्यू नाईट एडिशनच्या इतर व्हेरियंटसारखीच आहेत.

इंजिन आणि गिअरबॉक्स

व्हेन्यू नाइट एडिशन बाजारात दोन इंजिन पर्यायांसह उप्लब्ध आहे. ज्यामध्ये पहिले इंजिन १.२ लिटर कप्पा नॅचरली ऍस्पिरेटेड पेट्रोल इंजिन तर दुसरे हे १.० लिटरचे GDi टर्बोचार्ज इंजिन येते. पहिले इंजिन हे ८२ बीएचपी पॉवर आणि ११४ एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिनला ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडण्यात आले आहे. तर दुसरीकडे GDi टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन ११८ बीएचपी पॉवर आणि १७२ एनएम टॉर्क जनरेट करते.

किंमत

ह्युंदाईने आपल्या व्हेन्यू या मॉडेलचे नाइट एडिशन लॉन्च केले आहे. ह्युंदाई व्हेन्यूच्या नाइट एडिशनची किंमत १० लाखांपासून सुरू होते.

Story img Loader