Hyundai Exter 2025: देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी ह्युंदाई मोटर इंडियाने त्यांची सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही एक्स्टर अपडेट करून बाजारात आणली आहे. ग्राहकांना काहीतरी नवीन देण्यासाठी कंपनीने नवीन एक्स्टरमध्ये अनेक चांगल्या फीचर्सचा समावेश केला आहे. एक्स्टरची एक्स-शोरूम किंमत ७,७३,१९० रुपयांपासून सुरू होते. कंपनीचा दावा आहे की, नवीन फीचर्समुळे ग्राहकांचा ड्रायव्हिंग अनुभव सुधारेल. चला तर मग या कारमधील उपलब्ध फीचर्स आणि इंजिनबद्दल जाणून घेऊया…
ह्युंदाई एक्स्टर ग्राहकांना तिच्या लूकमुळे आवडते, तिची विक्रीही चांगली आहे. गाडीत चांगली जागा आहे. तसंच तुम्हाला ही एसयूव्ही पेट्रोल आणि सीएनजीमध्ये मिळेल. एक्स्टर पेट्रोल आणि हाय-सीएनजी डुओमध्ये उपलब्ध असलेल्या नवीन एसएक्स टेक व्हेरिएंटमध्ये आता काही चांगले फीचर्स बघायला मिळतील. ज्यात पुश-बटण स्टार्ट/स्टॉपसह स्मार्ट की, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक टेंपरेचर कंट्रोल, स्मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ, डॅशकॅम आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.
याशिवाय, एक्स्टरच्या S+ पेट्रोल व्हेरिएंटमध्ये ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, रियर कॅमेरा, रियर एसी व्हेंट, स्मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ आणि ड्युअल-टोन स्टाइल स्टील व्हील्स यांसारखे फीचर्स अपग्रेड करण्यात आले आहेत.
ह्युंदाईने आता एक्स्टरच्या S पेट्रोल व्हेरियंटमध्ये रियर पार्किंग कॅमेरा, अपग्रेडेड इन्फोटेनमेंट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट (VSM) आणि हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल (HAC) सारखे फीचर्स समाविष्ट केले आहेत. ह्युंदाईने सीएनजीमध्ये एस एक्झिक्युटिव्ह ( S Executive) आणि एस+ एक्झिक्युटिव्ह (S+ Executive) व्हेरिएंटदेखील सादर केले आहेत.
इंजिन आणि पॉवर
परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर एक्स्टरला १.२-लिटर पेट्रोल इंजिन मिळते जे ८२ बीएचपी पॉवर आणि ११३.८ एनएम टॉर्क निर्माण करते. हे ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा ५-स्पीड एएमटीसह जोडलेले आहे. एक्स्टरची स्पर्धा थेट टाटा पंच आणि निसान मॅग्नाइटशी आहे. दैनंदिन वापराव्यतिरिक्त, एक्स्टर ही लांब पल्ल्याच्या वापरासाठी चांगली एसयूव्ही आहे. कंपनीने या गाडीला ग्रँड आय१० च्या प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे.
२०२५ ह्युंदाई एक्सटरच्या एक्स-शोरूम किमती
Hyundai Exter व्हेरिएंट्स | किंमत |
Kappa Petrol S MT | 773,190 रुपये |
Kappa Petrol S+ MT | 793,190 रुपये |
Kappa Petrol S AMT | 843,790 रुपये |
Kappa Petrol SX Tech MT | 851,190 रुपये |
Bi-fuel Kappa Petrol with Hy – CNG S Executive MT | 8,55,800 रुपये |
Kappa Petrol S+ AMT | 8,63,790 रुपये |
Bi-fuel Kappa Petrol with Hy – CNG Duo S Executive MT | 8,64,300 रुपये |
Bi-fuel Kappa Petrol with Hy – CNG Duo S+ Executive MT | 8,85,500 रुपये |
Kappa Petrol SX Tech AMT | 918,190 रुपये |
Bi-Fuel Kappa Petrol with HY-CNG DUO SX Tech MT | 953390 रुपये |