Hyundai Motor कंपनीने आपल्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये त्यांची Grand i10 Nios नवीन डिझाईनमध्ये लॉन्च केले होते. त्याच्या काही दिवसांनीच कंपनीने याचे नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे. त्या मॉडेलला Hyundai Grand i10 NIOS Sportz Executive असे नाव देण्यात आले आहे. ह्युंदाई कंपनी एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी असून आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स आकर्षक फीचर्ससह लॉन्च करत असते. या मॉडेलबद्दल जाणून घेऊयात.
इंजिन
कंपनीने या मॉडेलच्या इंजिनमध्ये कोणत्याही प्रकराचा बदल केलेला नाही. म्हणजेच दोन्ही मॉडेलमध्ये सेम इंजिन असणार आहे. हे इंजिन ११९७ सीसीचे १.२ लिटरचे एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. त्यासोबत ५ स्पीड मॅन्युअल आणि ५ स्पीड गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच हे इंजिन ८१.८० बीएचपी पॉवर आणि ११३.८ एनएम इतके पीक टॉर्क जनरेट करते. कंपनी यासह फिटेड सीएनजी किटचा पर्यय देखील देते.
हेही वाचा : दरमहिना भरा फक्त १२ हजार अन् घरी घेऊन जा जबरदस्त मायलेज देणारी ६ लाखांची ‘ही’ कार
Grand i10 Nios Sportz Executive चे फीचर्स
Hyundai Grand i10 Nios Sportz मध्ये अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay सह ८ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, रिअर एसी व्हेंट्स, अडजस्टेबल ड्रायव्हिंग सीटसारखे फीचर्स दिले आहेत. तसेच यामध्ये मल्टी फंक्शन स्टिअरिंग व्हील, पॉवर अॅडजस्टेबल रिअर व्ह्यू मिरर, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, पॉवर विंडो, पॉवर स्टिअरिंग, चार एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड यासारखी फीचर्स देखील देण्यात आली आहेत. परंतु या एक्झिक्युटिव्ह व्हेरियंटमध्ये सध्याच्या मॉडेलप्रमाणे ऑटो एसीची सुविधा मिळणार नाही.
ह्युंदाईची हॅचबॅक सेगमेंटमध्ये Hyundai Grand i10 Nios Sportz एक्झिक्युटिव्ह व्हेरिएन्टची स्पर्धा मारुती सुझुकी इग्निस (Maruti Suzuki Ignis), मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) आणि टाटा टिआगो (Tata Tiago) या गाड्यांसह होणार आहे.
काय असणार किंमत ?
ह्युंदाई कंपनीने Hyundai Grand i10 Nios Sports एक्झिक्युटिव्ह मन्युअल मॉडेलसाठी ७.१६ लाख रुपये इतकी किंमत ठेवण्यात आली आहे .तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंटची सुरुवारतीची किंमत ही ७.७० लाख रुपये ठेवण्यात आली आहे.