Hyundai SUV Car Bookings Open: भारतीय बाजारपेठेत सात सीटर एसयुव्ही आणि एमपीव्ही गाड्यांना नेहमीच मोठी मागणी असते. एकत्र कुटुंबपद्दती असल्याने भारतीय जास्त सदस्य बसू शकतील अशा गाड्यांना पसंती देत असतात. अलीकडच्या काळात ही मागणी फार वाढली असून त्यामुळे बाजारात सात सीटर कारची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळेच आता कंपन्याही त्यांच्या ५-सीटर SUV कारचे सात-सीटर मॉडेल्स लाँच करत आहेत. यातच कार निर्माता ह्युंदाई इंडिया सुध्दा देशातील बाजारात मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. आपली नवी सात सीटर कार लवकरच दाखल करणार आहे. तत्पूर्वी कंपनीने या कारसाठी बुकींग सुरु केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिळालेल्या माहितीनुसार, ह्युंदाई इंडियाने अलीकडेच नवीन अल्काझर (Alcazar) या फेसलिफ्टसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे. ही एसयूव्ही सहा आणि सात सीटर पर्यायांसह सहा रंग आणि दोन-इंजिन पर्यायांमध्ये येईल. ही कार चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये एक्झिक्युटिव्ह, प्रेस्टिज, प्लॅटिनम आणि सिग्नेचरमध्ये ऑफर केली जाऊ शकते. बाहेरून, नवीन अल्काझरचा आकार कायम ठेवण्यात आला आहे. ही एसयूव्ही दिसायला पूर्वीपेक्षा खूपच मजबूत आहे. आता तिच्या स्टाइलमध्ये आणखी काही बदल करण्यात आले आहेत. त्याची फ्रंट डिझाईन आता Creta फेसलिफ्ट सारखीच ठेवण्यात आली आहे. त्याच्या पुढच्या बाजूला, H-आकाराच्या LED DRL सह बम्परवर LED प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि समोर एक मोठी ग्रिल आहे.

(हे ही वाचा: Activa, Jupiter नव्हे तर देशातील बाजारात ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची तुफान विक्री; खरेदी करण्यासाठी ग्राहकांची शोरूम्सवर गर्दी )

यामध्ये तुम्हाला नवीन रियर स्पॉयलर, हाय-माउंट स्टॉप लॅम्प आणि बॅश प्लेटसाठी डिझाइन मिळेल. नवीन अल्काझारमध्ये १०.२५-इंचांच्या दोन स्क्रीन, नवीन सीट्स, आणि दोन्ही रांगा साठी व्हेंटिलेटेड सीट्स असतील. तसेच, २०२४ अल्काझारला लेव्हल २ ADAS तंत्रज्ञानाचा समावेश असेल. इंजिन पर्यायांमध्ये १.५-लिटर टर्बो पेट्रोल आणि १.५-लिटर डिझेल इंजिन उपलब्ध असेल. यात ६ स्पीड मॅन्युअल आणि ७ स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले जाईल. दुसरीकडे, डिझेल इंजिन ११६ एचपी पॉवर आणि २५० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध असेल.

फेसलिफ्ट एसयूव्हीची बुकिंग सुरु झाली असून ती बुक करण्यासाठी तुम्हाला २५,००० रुपये भरावे लागतील. कंपनी ही कार ९ सप्टेंबरला लाँच करणार असून त्याच्या किमती जाहीर करेल. तथापि, अंदाजानुसार, त्याची सुरुवातीची किंमत १७ लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.