Tata Punch Rival: टाटा पंच सध्या मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय आहे. पण, आता याला टक्कर देण्यासाठी Hyundai एक नवीन Micro SUV लाँच करणार आहे, यामध्ये अनेक सेफ्टी फीचर्स असतील, त्यापैकी ६ एअरबॅग्स स्टँडर्ड म्हणून देण्यात येतील. त्याची बुकिंग विंडोही कंपनीने उघडली आहे. बाजारात सादर होण्यापूर्वी, Hyundai ने चेन्नई प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले आहे.

एसयूव्ही पाच ट्रिममध्ये उपलब्ध

कार निर्मात्याने पुष्टी केली आहे की, त्याची नवीन मिनी एसयूव्ही पाच ट्रिममध्ये उपलब्ध असेल, ज्यात EX, S, SX, SX (O) आणि SX (O) Connect. यात पेट्रोल आणि सीएनजी असे दोन इंधन पर्याय असतील. हे एकूण १५ प्रकारांमध्ये विकले जाईल. या कारमध्ये स्मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ तसेच ड्युअल कॅमेऱ्यांनी सुसज्ज डॅशकॅम दिले जाणार आहे.

Reliance Industries market capitalization at 21 lakh crores
‘सेन्सेक्स’ ७९ हजारांच्या पातळीवर कायम; रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल २१ लाख कोटींवर
MG Comet EV Price Hike
देशातील सर्वात लहान अन् स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली महाग; एकदा चार्ज केल्यानंतर धावणार २३० किमी, आता किती पैसे मोजावे लागणार?
Hyundai Kona Electric discontinued in market
शाहरुख खान ब्रँड ॲम्बेसेडर असलेली लोकप्रिय Hyundai ची कार कंपनीने गुपचूप केली बंद; कारण काय?
Cheapest Electric Scooter
६९ हजार रुपये किंमत, एका चार्जवर धावेल ११० किलोमीटर; ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, पाहा यादी
fake powerbank exposed
रेल्वेमध्ये स्वस्तात विकल्या जाणाऱ्या वस्तू खरेदी करताय? प्रवाशांनी फेक पॉवर बँक विक्रेत्याचा कसा केला भांडाफोड? एकदा Video पाहा
Hyundai Motor India IPO
LIC पेक्षाही मोठा IPO येतोय; ह्युंदाई मोटर इंडिया २५ हजार कोटी रुपये उभारणार
Tata Punch facelift 2024
टाटाचा नाद करायचा नाय! देशात नव्या अवतारात आणतेय ‘ही’ सर्वात सुरक्षित कार; मायलेज २६ किमी अन् किंमतही कमी
Global brand of home tidiness Welspun Group
माझा पोर्टफोलियो – घराच्या नेटकेपणाची जागतिक नाममुद्रा

कधी होणार दाखल?

Hyundai आपली नवीन Hyundai Exter लाँच करणार आहे. ही कार येत्या १० जुलै रोजी दाखल होणार आहे. Grand i10 Nios च्या प्लॅटफॉर्मवर आधारित ही असेल. त्याची एकूण लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे ३५९५ मिमी, १५९५ मिमी आणि १५७५ मिमी असेल. मायक्रो एसयूव्ही मोनोटोन आणि ड्युअल-टोन अशा दोन्ही कलर पर्यायांमध्ये सादर केली जाईल.

(हे ही वाचा : Maruti Suzuki eVX: आता मारुतीही बाजारात आणणार पहिली इलेक्ट्रिक कार; ‘या’ देशामध्ये टेस्टिंगदरम्यान दिसली झलक, कधी होणार लॉन्च? )

इंजिन

नवीन Hyundai micro SUV १.२L नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि १.२L पेट्रोल + CNG किट इंधन पर्यायासह सादर केली जाईल. पेट्रोलवर इंजिन ८३bhp आणि ११३.८Nm जनरेट करेल. हे ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड AMT गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध असेल. इंजिन पेट्रोलच्या तुलनेत CNG वर किंचित कमी पॉवर आउटपुट तयार करेल आणि केवळ ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसाठी जोडले जाईल.

किंमत किती असेल?

कंपनीने या कारची बुकिंग विंडोही उघडली आहे. ११,००० रुपयात तुम्हाला या कारची बुकिंगही करता येणार आहे. Exter ही Hyundai ची भारतातील सर्वात स्वस्त SUV असेल. किंमत जाहीर करण्यास अजून वेळ आहे. त्याच्या बेस व्हेरियंटची किंमत सुमारे ५.५० लाख रुपये असू शकते, जी टॉप-एंड व्हेरियंटसाठी ११ लाखांपर्यंत जाऊ शकते. तर, टाटा पंचची किंमत सुमारे ६ लाख रुपयांपासून सुरू होते.