ह्युंदाई मोटर इंडियाने या महिन्यात भारतीय ग्राहकांसाठी निवडक मॉडेल्सवर सवलत देत आहे. कोरियन कार उत्पादक कंपनीने लोकप्रिय हॅचबॅक मॉडेल्सवर सूट दिली आहे. निवडक मॉडेल्ससाठी सवलत जवळपास ५० हजार रुपयांपर्यंत जाते. ऑफरमध्ये सॅन्ट्रो, i20 आणि Grand i10 NIOS या कारचा समावेश आहे. पण ह्युंदाईचे प्रमुख मॉडेल जसे क्रेटा कॉम्पॅक्ट एसयूव्ही किंवा अल्काझाल तीन-पंक्ती एसयूव्हीवर कोणतीही सवलत नाही. त्याचबरोबर Venue, Tucson, Elantra आणि Verna देखील या फायद्यांसह मॉडेलच्या यादीत समावेश नाही. ह्युंदाई ही सवलत रोख, कॉर्पोरेट फायदे किंवा एक्सचेंज बोनसच्या रूपात देत आहे. ऑफर या महिन्याच्या शेवटपर्यंत असणार आहे.
Hyundai Grand i10 NIOS: भारतीय बाजारपेठेतील कोरियन कार निर्मात्याकडून ग्रँड i10 NIOS प्रीमियम हॅचबॅक सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेलपैकी एक आहे. फेब्रुवारीमध्ये ह्युंदाइ Grand i10 Nios वर जास्तीत जास्त ४८ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. ही गाडी पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजी आवृत्त्यांसह ग्राहकांना हॅचबॅक ऑफर केली जाते. Grand i10 NIOS ला ट्रान्समिशन पर्याय म्हणून मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्सेस मिळतात. Grand i10 Nios ची किंमत ५.२९ लाख ते रु.८.५१ लाख (एक्स-शोरूम) रुपयांपर्यंत आहे.
Hyundai Santro: कोरियन कार निर्मात्याच्या सर्वात जुन्या विद्यमान मॉडेल्सपैकी एक म्हणजे सँट्रो कार. या गाडीचा सवलत असलेल्या कारच्या यादीमध्ये समावेश आहे. नवीन पिढीच्या सँट्रोसाठी ४० हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मात्र, ही ऑफर फक्त हॅचबॅकच्या पेट्रोल व्हेरियंटवरच आहे. ह्युंदाइ सँट्रो ही ५-सीटर कार आहे जी ५-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. ह्युंदाई सँट्रोची किंमत ४.८६ लाख ते ६.४४ लाख (एक्स-शोरूम) रुपयांपर्यंत आहे.
मालवाहू जहाजाला आग लागल्याने Porsche, Audi सह चार हजार लक्झरी गाड्यांचं नुकसान!
Hyundai i20: ह्युंदाईकडून लोकप्रिय प्रीमियम हॅचबॅक समान सवलतींसह ऑफर केली जाते. ही ऑफर फक्त i20 हॅचबॅकच्या डिझेल व्हेरियंटवर लागू आहे. Hyundai i20 ची किंमत ६.९८ लाख ते रु. ११.४७ लाख (एक्स-शोरूम) रुपयांपर्यंत आहे.