Hyundai & MG Motors Sales: जून महिन्यातील कार विक्रीचे आकडे समोर येऊ लागले आहेत. टोयोटाने गेल्या महिन्यात १९ टक्क्यांच्या वाढीसह १९,६०८ कार विकल्या आहेत. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस आणि हायरायडर हे कंपनीसाठी सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहेत. याशिवाय ह्युंदाई आणि एमजी मोटर्सनेही वाढ नोंदवली आहे. Hyundai Motor India Limited (HMIL) ची एकूण घाऊक विक्री जूनमध्ये ६५,६०१ युनिट्स होती. Hyundai ने वार्षिक आधारावर पाच टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीने निवेदनात ही माहिती दिली आहे.
कंपनीने जून २०२२ मध्ये ६२,३५१ युनिट्सची किरकोळ विक्री केली. कंपनीने म्हटले आहे की, “देशांतर्गत विक्री मे २०२२ मधील ४९,००१ युनिट्सवरून मे महिन्यात ५०,००१ युनिट्सवर वार्षिक दोन टक्क्यांनी वाढली आहे.” कंपनीने सांगितले की, जूनमध्ये निर्यात १७ टक्क्यांनी वाढून १५,६०० युनिट्सवर गेली आहे, जी गेल्या वर्षी मे महिन्यात १३,३५० युनिट्स होती. कंपनीचे सर्वात कमी किमतीचे मॉडेल Hyundai Grand i10 Nios आहे, ज्याची किंमत ५.७ लाख रुपये आहे. कंपनी आता स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) Exeter बाजारात आणणार आहे. कंपनीच्या या कारची थेट स्पर्धा टाटा पंचशी होणार आहे.
(हे ही वाचा : Maruti Brezza चा गेम होणार? देशात येतेय नवी CNG SUV कार, मायलेज ३० किमी अन् किंमत… )
एमजी मोटर इंडिया विक्री
एमजी मोटर इंडियाची किरकोळ विक्री जूनमध्ये ५,१२५ युनिट्सपर्यंत वाढली आहे. MG ने वार्षिक आधारावर १४ टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीने निवेदनात ही माहिती दिली आहे. एमजी मोटर इंडियाने जून २०२२ मध्ये ४,५०४ युनिट्सची किरकोळ विक्री केली.
कंपनीने सांगितले की, २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल-जून) तिची विक्री ४० टक्के वार्षिक वाढीसह १४,६८२ युनिट्स होती, जी मागील वर्षी याच कालावधीतील १०,५१९ युनिट्सच्या तुलनेत होती.