Hyundai Exter launch in India: Hyundai EXTER micro-SUV ची प्रतीक्षा संपली आहे. Hyundai Motor India ची सर्वात स्वस्त SUV भारतीय बाजारात दाखल झाली आहे. कंपनीने या नवीन कारचा बेस व्हेरिएंट ५.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत सादर केला आहे. याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत ९.३१ लाख रुपये आहे.

Hyundai EXTER कंपनीच्या इतर मॉडेल Grand i10 Nios च्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. निओसच्या धर्तीवर कंपनीची ही कार पेट्रोल व्हर्जनसोबतच सीएनजी व्हर्जनमध्येही सादर करण्यात आली आहे. नवीनतम Hyundai EXTER बाजारात उपलब्ध असलेल्या Tata Punch, Maruti Suzuki Fronx सारख्या वाहनांना टक्कर देते. त्यासाठी बुकिंग सुरू आहे. नवीन कारमध्ये दिलेली वैशिष्ट्ये, इंजिनसह सर्व महत्त्वाचे तपशील जाणून घेऊया…

Car blast protection avoid putting these things in your car boot trunk car safety tips
चक्क बॉम्बसारखी फुटेल कारची डिकी; गाडीत ‘या’ गोष्टी ठेवत असाल, तर सावधान! एक छोटीशी चूक पडेल महागात
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Kia Syros SUV price features
KIA च्या ‘या’ कारची लाँच आधीच बुकिंग सुरू; नेमकी इतकी मागणी का? फीचर्स काय आहेत, जाणून घ्या
What is best time to change car engine oil for maximum performance
कार घेतलीय पण ‘ही’ गोष्ट अजूनही माहित नाही! जाणून घ्या, गाडीचे ‘इंजिन ऑइल’ किती दिवसांनी बदलावे…
Maruti Suzuki car price loksatta news,
‘या’ कार कंपनीकडून वाहनांच्या किमतीत मोठी वाढ
Royal Enfield Scram 440 price, features, and specifications in Marathi
नवीन वर्षात Royal Enfield चा धमाका! बुलेटप्रेमींनो धासू Scram 440 लाँच, किंमत फक्त इतकी: जाणून घ्या जबरदस्त फीचर्स
man sold car gifted by friend and buy an ambulance
असेही औदार्य! मित्रांनी भेट दिली कार, ती विकून घेतली रुग्णवाहिका…
Suzuki Access 125 price features amd more
स्कूटरप्रेमींनो, Suzuki Access 125 चे अपडेटेड व्हर्जन लाँच; जाणून घ्या किंमत, फीचर्स अन् सर्व काही

Hyundai EXTER SUV: रंग

Hyundai ची नवीन micro SUV-EXTER भारतीय बाजारपेठेत अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. रेंजर खाकी आणि कॉस्मिक ब्लू या व्यतिरिक्त ही कार व्हाइट विथ ब्लॅक रुफ, स्टाररी नाईट, फायरी रेड, अॅटलस व्हाईट, व्हाइट विथ ब्लॅक रुफ अशा रंगात उपलब्ध असेल. ही कार काळ्या छतासह टायटन ग्रे आणि कॉस्मिक ब्लू या रंगात सादर करण्यात आली आहे.

(हे ही वाचा : Hero ची उडाली झोप, TATA ची नवी स्वस्त इलेक्ट्रिक सायकल देशात दाखल, १ किमीचा खर्च १० पैसे, किंमत… )

Hyundai EXTER SUV: डिझाइन आणि वैशिष्ट्ये

नवीन कारमध्ये दिलेल्या फीचर्सवर नजर टाकली तर Hyundai EXTER मध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, डॅशकॅम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ८-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. डिझाईनच्या बाबतीत तरुण पिढीच्या ग्राहकांना लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. कारच्या पुढील भागाला H आकाराचे DRL, प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि एक विशिष्ट ग्रिल आहे. साइड व्ह्यू डायमंड कट अॅलॉय व्हील, प्रमुख साइड क्लेडिंग दाखवते. कारच्या मागील बाजूस रुंद पट्टीसह H आकाराचा LED टेल लाइट दिसतो.

Hyundai EXTER SUV इंजिन आणि मायलेज

Hyundai Xtor ला १.२ लीटर काप्पा पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीने कारच्या सीएनजी व्हर्जनमध्येही हेच इंजिन दिले आहे. हे इंजिन ८१.८६ bhp पॉवर आणि ११३.८ Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. सीएनजी व्हर्जनमध्ये या कारचे इंजिन ६८ बीएचपी पॉवर आणि ९५.२ एनएम टॉर्क जनरेट करते. मॅन्युअल ट्रान्समिशनसह एक्स्टर एक लिटर पेट्रोल वापरून १९.४ किलोमीटर अंतर कापेल, असा कंपनीचा दावा आहे. AMT गिअरबॉक्ससह ट्रिम पेट्रोलवर १९.२ किलोमीटर प्रति लिटर मायलेज परत करण्यास सक्षम असेल. दुसरीकडे, ही CNG आवृत्ती कार एक किलो CNG वापरून २७.१ किमी मायलेज देईल. Hyundai ची सर्वात स्वस्त कार देखील E20 इंधनावर धावेल. E20 इंधन असे आहे ज्यामध्ये २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोल असते.

Hyundai EXTER SUV: किंमत

या कारचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे. कंपनीच्या अधिकृत साइटवरून तुम्ही स्वतःसाठी ही कार बुक करू शकता. ही कार बुक करण्यासाठी तुम्ही ११,००० रुपये टोकन रक्कम भरून ती बुक करु शकता. Hyundai च्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत ५.९९ लाख रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटची किंमत ९.३१ लाख रुपये आहे. कंपनीने ही कार एकूण ७ ट्रिममध्ये सादर केली आहे. ही कार Hyundai ची सर्वात परवडणारी SUV असेल. 

Story img Loader