गेल्या काही महिन्यामध्ये देशातील अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या सर्व वाहनांच्या मॉडेलच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. Hyundai motors या कंपनीने देशामध्ये सर्वाधिक विक्री होणारी त्यांची हॅचबॅक कार लॉन्च केली आहे. Hyundai i20 ही कार लॉन्च केली आहे. मात्र सर कंपन्या आपल्या वाहनांच्या किंमतीमध्ये वाढ करत असताना ह्युंदाईने या गाडीच्या किंमतीमध्ये घट केली आहे.
Hyundai कंपनीने आपल्या i20 च्या Sportz Edition मॉडेलच्या किंमतीत ही कपात केली आहे. यामध्ये कंपनीकडून या मॉडेलच्या एक्स-शोरूम किंमतीमध्ये ३,५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता देशात Hyundai i20 Sportz ची एक्स-शोरूम किंमत ८.०५ लाख रुपये इतकी झाली आहे. i20 Sportz IVT ची एक्स-शोरूम किंमत ९.०७ लाख रुपये झाली आहे.
हेही वाचा : दरमहिना भरा फक्त १२ हजार अन् घरी घेऊन जा जबरदस्त मायलेज देणारी ६ लाखांची ‘ही’ कार
काय आहे किंमत कमी होण्याचे कारण ?
Hyundai i20 ही या सेगमेंटमधील इतर कारला टक्कर देत बाजारामध्ये तीचे विक्रीचे प्रमाण देखील अधिक आहे. अशा स्थितीमध्ये कंपनीने किंमत कमी करणे हे ग्राहकांना थोडे विचित्र वाटू शकते. मात्र त्यामागे एक कारण आहे. कंपनीने आता या कारच्या Sportz प्रकारात आधीच असलेले ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल फीचर काढून टाकले आहे आणि त्याच्या जागी हीटरसह मॅन्युअल एसी हे फिचर दिले आहे. काही ग्राहकांना त्याचा फारसा फरक पडणार नाही, पण काही ग्राहकांना त्याची उणीव नक्कीच जाणवू शकते.
Hyundai i20 स्पोर्ट्स ट्रिमच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ग्राहकांना १. २ लिटरचे इंजिन मिळते. हे इंजिन ८१. ८ बीएचपी पॉवर आणि ११४.एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन iVT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.