Second Hand Vehicle Guide: देशात सेकंड हँड कारचे मार्केट खूप मोठे झाले आहे, जे नवीन कार मार्केटला समांतर चालत आहे. ज्यांच्याकडे नवीन कार खरेदी करण्यासाठी किंवा मासिक ईएमआय भरण्याचे बजेट नाही त्यांच्यासाठी सेकंड हँड कार हा सर्वोत्तम पर्याय असेल. जर तुम्ही सेकंड हँड मिड साइज एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी या एसयूव्हीबद्दल जाणून घ्या जी २०२२ मध्ये सेकंड हँड कार मार्केटमध्ये सर्वात लोकप्रिय कार म्हणून उदयास आली आहे.
वास्तविक, ऑनलाइन सेकेंड हँड वाहनांची खरेदी, विक्री आणि सूचीबद्ध करण्याव्यतिरिक्त, हा अहवाल ऑटो सेक्टरची माहिती देणारी वेबसाइट DROOM द्वारे जारी केला आहे, ज्याला इंडिया ऑटोमोबाइल ई कॉमर्स रिपोर्ट (India Automobile E Commerce Report) असे नाव देण्यात आले आहे.
(हे ही वाचा : एकेकाळी ‘या’ कारची लोकांमध्ये तुफान क्रेझ! पण मारुतीच्या ‘या’ कारने केला खेळ खल्लास अन् ग्राहकांनी फिरवली पाठ )
‘ही’ सेकंड हँड कार ठरली सर्वाधिक पसंतीची
ऑटोमोबाईल ऑनलाइन विक्री अहवालानुसार, Hyundai Motors ची मध्यम आकाराची SUV Hyundai Creta ही २०२२ मध्ये चाकी सेगमेंटमध्ये सर्वाधिक पसंतीची सेकंड हँड कार बनली आहे.
किआ सेल्टोस दुसऱ्या क्रमांकावर आणि मारुती सुझुकी विटारा ब्रेझा तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक पसंतीच्या सेकंड हँड कारमध्ये आहे.
Hyundai Creta किंमत
Hyundai Creta ची एक्स-शोरूम किंमत १०.८४ लाख रुपयांपासून सुरू होते जी टॉप मॉडेलसाठी १९.१३ लाख रुपयांपर्यंत जाते. पण सेकंड हँड कार मार्केटमध्ये तुम्हाला ही SUV ४ लाख ते लाख रुपयांच्या बजेटमध्ये मिळेल.