Hyundai मोटर्स ही देशातील आघाडीची आणि लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आता कंपनीने EV कार्स सुद्धा तयार केल्या आहेत. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करतच असते. ह्युंदाई कंपनीने आपला एप्रिल महिन्यातील विक्रीचा रिपोर्ट जाहीर केला आहे. एप्रिल महिन्यात ह्युंदाई कंपनीने आपल्या किती युनिट्सची विक्री केली आहे व मागच्या वर्षीपेक्षा किती जास्त झाली आहे ते जाणून घेऊयात.
Hyundai मोटर्सने आपल्या एप्रिलमध्ये झालेल्या गाडयांच्या विक्रीचा रिपोर्ट जाहीर केला आहे. ज्यामध्ये कंपनीने एप्रिल २०२३ मध्ये एकूण ५८,२०१ युनिट्सची विक्री केली आहे. ज्यामध्ये ४९,७०१ युनिट्सची विक्री ही भारतामध्ये आणि ८,५०० युनिट्सची विक्री ही बाहेर झाली आहे. मागच्या वर्षी विकल्या गेलेला ४४,००१ युनिट्सपेक्षा १२.९ टक्क्यांनी जास्त आहे. कंपनीची विक्री वाढवण्यासाठी नुकत्याच लॉन्च झालेल्या नवीन पिढीतील सेडान कार ह्युंदाई verena व्यतिरिक्त Creta आणि i20 सारख्या वाहनांचा समावेश आहे.
कंपनीच्या एप्रिल २०२३ मध्ये वाहनांच्या निर्यातीमध्ये घट पाहायला मिळाली आहे. ज्याची टक्केवारी ३०.३ इतकी आहे. मागील वर्षी याच महिन्यात १२,२०० युनिट्सची विक्री झाली होती. जर या महिन्याबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने गाड्यांच्या विक्रीमध्ये ३.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ह्युंदाई कंपनी सध्या देशांतर्गत १२ मॉडेल्सची विक्री करते. ज्यामध्ये Grand i10 Nios, Hyundai Aura, Hyundai i20, Hyundai Venue, Hyundai Verna, Hyundai Creta, Hyundai Alcazar, Hyundai Tucson आणि दोन इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. याशिवाय, कंपनी लवकरच आणखी एक SUV Hyundai Xtor ला आपल्या लाइनअपमध्ये समाविष्ट करणार आहे.