भारतात एकत्र कुटुंबपद्धती असल्याने जास्त सदस्य बसू शकतील अशा गाड्यांना ग्राहक नेहमीच पसंती देत असतात. हे लक्षात घेता, नवनवीन फीचर्सच्या गाड्या विविध कंपन्या बाजारात घेऊन येत असतात. ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी ह्युंदाईने हीच बाब लक्षात ठेवून नवीन ‘व्हेन्यू ॲडव्हेंचर एडिशन’ (Venue Adventure Edition) सादर केली आहे. नाइट एडिशननंतर, व्हेन्यूसाठी ही दुसरी खास ट्रिम आहे. नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही तीन व्हेरिएंटमध्ये येते. दोन पॉवर ट्रेन आणि दोन ट्रान्समिशन पर्याय देते,. याव्यतिरिक्त, Hyundai अतिरिक्त शुल्क आकारून व्हेन्यू ॲडव्हेंचरसाठी ड्युअल-टोन पेंट स्कीम प्रदान करते. तसेच नवीन Venue Adventure Edition ची किंमत फक्त १०.१५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

डिझाईन :

व्हेन्यू ॲडव्हेंचरमध्ये ब्लॅकआउट एलिमेंट्स आहेत जसे की, समोर लोखंडी जाळी, पुढील बंपरवरील एअर डॅम, पुढील व मागील बाजूस स्किड प्लेट्स, रूफसाठी रेल, बाहेर रीअरव्ह्यू मिरर, रेड फ्रंट ब्रेक कॅलिपरसह अलॉय व्हील्स व शार्क फिन अँटेना आहेत. स्पेशल एडिशन म्हणून यात ए-पिलरच्या खाली ऑल-ब्लॅक Hyundai लोगो व ॲडव्हेंचर बॅज आहेत. व्हेन्यू ॲडव्हेंचर एडिशनला अधिक चांगला रोड प्रेझेन्स देण्यासाठी Hyundai ने खडबडीत क्लेडिंगसह दरवाजेदेखील वाढवले ​​आहेत.

Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती, स्कॉर्पिओ, टोयोटा इनोव्हा, बोलेरोला ही टाकले मागे
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
New Toll Tax Rules : महामार्ग, द्रुतगती मार्गांवर २० किमीपर्यंत टोल माफ, फास्टॅगचीही गरज नाही; जाणून घ्या नवीन नियम
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?

हेही वाचा…२००८ पासून मार्केट गाजवणारी Yamaha आता नव्या अवतारात दाखल; किंमत पूर्वीपेक्षा कमी, तर इंजिनचंही बदललं रूप

केबिन :

ह्युंदाई व्हेन्यू ॲडव्हेंचर एडिशनमध्ये काळ्या, हिरव्या रंगाच्या upholstery ड्युअल कलरसह ऑल-ब्लॅक इंटेरियर आहे. दरवाजावरील आर्मरेस्टला व्हाईट स्विचिंग आणि 3D ॲडव्हेंचर फ्लोअर मॅट्ससह सॉफ्ट टच फिनिश देण्यात आला आहे. फीचर्सच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, या एडिशनमध्ये ड्युअल कॅमेरा, मेटल फिनिश स्पोर्टी पेडल्ससह डॅशकॅम देण्यात आला आहे.

किंमत व व्हेरिएंट :

वेन्यू ॲडव्हेंचर एस (ओ) प्लस {S(O)+}, एसएक्स { SX } व एसएक्स (ओ) {SX(O)}, अशा तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तसेच व्हेन्यू ॲडव्हेंचर एडिशनमध्ये दोन इंजिने आहेत. १.२ लिटर पेट्रोल इंजिन आणि पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्स्मिशन, ८२ बीएचपी व ११३.८ एनएम टॉर्क जनरेट करते आणि १.० लीटर टर्बो पेट्रोल इंजिन जे ७ स्पीड डीसीटी जनरेट करते; तर ११८ बीएचपी पॉवर आणि १७२ एनएम टॉर्क जनरेट करते. हे ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्स्मिशनसह जोडलेले आहेत.