Hyundai Exter launch on July 10: दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई १० जुलै रोजी भारतीय बाजारात Micro-SUV Exter लाँच करणार आहे. लाँचपूर्वी आगामी कारचा इंटेरिअर लुक समोर आला आहे. एक्स्टर मायक्रो-एसयूव्हीचे इंटीरियर जबरदस्त असल्याचं फोटोतून समजते. ही कार भारतासह काही निवडक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये लॉन्च केली जाईल. यात सनरूफ देखील असेल आणि ते पेट्रोल आणि सीएनजी इंजिन पर्यायांसह देऊ शकते.

ह्युंदाईने आपल्या एक्सटर SUV चे टीझर आधीच जारी केलेले आहे. या कारची लांबी ३.८ मीटर असू शकते. यात टच सपोर्ट सोबत ८ इंचाचा इंफोटेनमेंट सिस्टम मिळू शकते. कारमध्ये स्मार्टफोन कनेक्टिविटी फीचर्स, इलेक्ट्रिक सनरूफ, सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि ब्लूलिंक कनेक्टेड कार टेक्नोलॉजी सारखी सुविधा मिळण्याची शक्यता आहे. एबीएस, ईबीडी, एअरबॅग्ज, एचएसए आणि टीपीएमएस सारखे फीचर्सही दिले जाऊ शकतात.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल

Exter मध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्स सोबत १.२L ४ सिलिंडर इंजिन दिले जाऊ शकते. याचे पॉवर आणि टॉर्क आउटपूट ८३ bhp आणि ११४ Nm चे असेल. याशिवाय, SUV मध्ये १ लीटरचे टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते. हे १२० बीएचपीचे पॉवर आणि १७५ एनएमचे टॉर्क जनरेट करेल.

(हे ही वाचा : मोठी बातमी! महाग होणार टाटाच्या कार; ‘या’ तारखेपासून मोजावे लागणार जास्त पैसे  )

दरम्यान कार लाँच करण्यााधीच कंपनीने Hyundai SUV Exter साठी बुकिंग सुरु केलं आहे. Hyundai ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर कार बुकिंगची माहिती दिली आहे. फक्त ११ हजारांच्या टोकनवर तुम्ही ही कार बूक करु शकता असं कंपनीने सांगितलं आहे. 

Hyundai Exter अपेक्षित किंमत

कंपनीने अद्याप या कारची किंमत किती असेल याचा खुलासा केलेला नाही. पण एंट्री लेव्हल SUV असल्याने या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे तर, Hyundai Exter ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत सुमारे ६ लाख ते १० लाख रुपये असण्याची शक्यता आहे. Exter ही कार Grand i10 Nios, निसान मॅग्नाइट आणि रेनॉल्ट किगर व्यतिरिक्त थेट टाटा पंच आणि मारुती सुझुकी फ्रॉन्क्सशी स्पर्धा करेल.