Hyundai एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. ह्युंदाई कंपनी लवकरच आपली Exter एसयूव्ही लॉन्च करणार आहे. ही एसयूव्ही १० जुलै २०२३ रोजी लॉन्च करणार आहे. हे कंपनीच्या सेगमेंटमधील सर्वात लहान एसयूव्ही कार आहे. यामध्ये कंपनीने अनेक फीचर्स दिले वाईट. कंपनीने या एसयूहीच्या इंटेरिअरचे फोटोज शेअर केले आहेत.

इंटेरिअर आणि फीचर्स

नवीन ह्युंदाई exter चा डॅशबोर्ड ग्रँड i10 Nios आणि Aura च्या डॅशबोर्ड सारखे आहे. यामध्ये अँड्रॉइड ऑटो, Apple कार प्ले आणि ह्युंदाईच्या BlueLink कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसह यामध्ये ८.० इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात येणार आहे. तसेच या एसयूव्हीमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिक सनरूफ, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम ग्राहकांना मिळणार आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
Kishkindha Kaandam OTT Release
फक्त सात कोटींचे बजेट, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी; OTT वर रिलीज होतोय ‘हा’ सुपरहिट चित्रपट
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल

हेही वाचा : VIDEO: ह्युंदाई Exter साठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून हार्दिक पांड्याची निवड; म्हणाला, “ही एसयूव्ही…”

इंजिन आणि गिअरबॉक्स

Hyundai Exter ला पॉवर १.२-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे Grand i10 Nios आणि काही इतर Hyundai कारला देखील शक्ती देते. हे इंजिन ८२ bhp कमाल पॉवर आणि ११३ Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारला ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह AMT पर्याय देखील मिळतो. Hyundai Exter मध्ये देखील CNG चा पर्याय उपलब्ध होणार आहे.

ह्युंदाई Exter (Image Credit- hyundai.com)

किंमत आणि स्पर्धा

Hyundai Exter Micro एसयूव्हीची किंमत ६ लाख रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. ह्युंदाईने लाँचिंग आधीच नवीन एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक ११,००० रुपयांच्या टोकन रकमेसह बुकिंग करू शकतात. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा Hyundai डीलरशिपवरून बुक केले जाऊ शकते.

डिझाइन कसे आहे?

ह्युंदाईने आपल्या एक्सटर SUV चे टीझर आधीच जारी केलेले आहे. या कारची लांबी ३.८ मीटर असू शकते. यात टच सपोर्ट सोबत ८ इंचाचा इंफोटेनमेंट सिस्टम मिळू शकते. कारमध्ये स्मार्टफोन कनेक्टिविटी फीचर्स, इलेक्ट्रिक सनरूफ, सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि ब्लूलिंक कनेक्टेड कार टेक्नोलॉजी सारखी सुविधा मिळण्याची शक्यता आहे.

ह्युंदाई Exter (Image Credit- hyundai.com)

रिपोर्ट्सनुसार, यामध्ये एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर एच शेप हेडलॅम्प, १७-इंचाचे अलॉय व्हील यांसारखे अनेक फीचर्स दिले जाऊ शकतात. त्याचवेळी, डिजिटल एमआयडी, स्टीयरिंगवरील नियंत्रणे आणि सुरक्षिततेसाठी अनेक वैशिष्ट्ये आतील भागात आढळू शकतात.