Hyundai Price Hike April 2023: आघाडीची कार उत्पादक कंपनी Hyundai ने एप्रिलपासून आपल्या सर्व वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. जर तुम्हाला नवीन ह्युंदाई कार घ्यायची असेल तर ही बातमी पूर्ण वाचा जिथे तुम्हाला अपडेट केलेल्या किमतींबद्दल सांगण्यात येणार आहे. Hyundai SUV च्या किमती १ एप्रिल २०२३ पासून १३,००० रुपयांनी वाढल्या आहेत. तथापि, सर्व प्रकारांना समान दरवाढ मिळालेली नाही.
Hyundai Creta
Hyundai Creta च्या किमतीत ७,००० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. १.४ DCT S+ DT, १.६ MT SX एक्झिक्युटिव्ह, १.४ DCT SX (O) आणि १.५ MT SX एक्झिक्युटिव्ह सारख्या पेट्रोल प्रकारांच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. Creta चे बेस E, EX, S, S+ Night आणि SX व्हेरियंट्स ३,००० रुपयांनी वाढले आहेत.
क्रेटा १.५L MPi आणि IVT पॉवरट्रेन कॉम्बोसह १.५ IVT SX, 1.5 IVT SX (O) आणि १.५ IVT SX (O) नाइट सारख्या सर्व पेट्रोल प्रकारांची किंमत ७,००० रुपयांपर्यंत वाढली आहे. नवीन दरवाढीमुळे क्रेटा पेट्रोलची श्रेणी आता १० लाख ८७ हजार रुपयांपासून सुरू होत आहे.
(हे ही वाचा : टोयोटाची ‘ही’ MPV कार Mahindra Scorpio चा खेळ संपवणार, कमी किमतीत मिळतील धासू फीचर्स )
Hyundai Alcazar
Hyundai Alcazarच्या किमती ३ हजार रुपयापर्यंत वाढल्या आहेत. Hyundai च्या फ्लॅगशिप SUV Tucson बद्दल बोलायचे झाले तर तिची किंमत १२,००० रुपयांवरून १३,००० रुपये करण्यात आली आहे.
Hyundai Venue, Venue N Line
Hyundai Venue आणि Venue N Line या दोन्हीच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. Venue E १.२ MT, S १.२ MT, S (O) १.२ MT आणि S (O) १.० iMT प्रकारांची किंमत ३,००० रुपयांनी वाढली आहे, तर SX १.२ MT आणि SX (O) १.० iMT च्या किमतीत वाढ झाली आहे. ४,००० रुपयापर्यंत किंमत वाढवण्यात आली आहे.
S (O) १.० DCT आणि SX (O) १.० DCT सारख्या DCT गिअरबॉक्ससह ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत ७,००० रुपयांनी वाढली आहे.